कारंजा : ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा लाभलेले,कारंजा शहर हे शांतता, सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून सर्वधर्मियांच्या सामजस्यांमुळे ओळखल्या जाते. येथील श्रीगणेशोत्सव-श्री नवदुर्गोत्सव आणि सर्वच धार्मिक महोत्सव यात्रा मिरवणुका आनंद, उत्साह व जल्लोषात साजरे होत असतात. व सदरहु उत्सवा करीता दुररून बाहेरगावचे आणि ग्रामिण भागातील खेड्यापाडयाचे नागरिक व महिला मंडळी सुद्धा येत असतात . त्यामुळे श्री गणेशोत्सव - दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमेटी सदस्य, पत्रकार मंडळी तथा सामाजिक कार्यकर्ते यांची ओळख बंदोबस्तावरील अनोळखी सुरक्षारक्षकांना व नागरिकांनाही असावी म्हणून त्यांना पोलिस विभागाकडून ओळखपत्र देण्याची मागणी - नुकत्याच झालेल्या शांतता कमेटीचे सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव कपिल महाजन यांनी, जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिह तथा शहर पोलिस निरिक्षक आधारसिह यांनी केली आहे . तसेच उत्सवतिल उत्कृष्ट देखावे व सामाजिक कार्य करणार्या मंडळाना आणि समाजसेवक व कलावंताना शांतता कमेटीच्या वतीने सन्मानित करण्यात यावे असी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे असे वृत्त, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .