गोठ्यात म्हशीला बांधत असताना तिने हल्ला केल्यामुळे गंभीर झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १२) सकाळी ११:३० वाजता सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरवाणी येथे घडली. मुनेश्वर गोविंदा लंजे (४३, रा. पांढरवाणी, ता. सडक-अर्जुनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २ जुलै रोजी मुनेश्वर लंजे यांना म्हशीने मारल्याने त्यांचा प्रथमोपचार सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ जुलै रोजी सायंकाळी ७: ३० वाजता दाखल करण्यात आले होते. १० दिवस उपचार सुरू असताना १२ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.