कारंजा (लाड) : येत्या शनिवारी दि.07 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार असून त्यानिमित्ताने,श्री गणेश मंडळांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत श्री गणेश मंडळाची नोंद झालेली आहे. तसेच रविवार दि. 08 सप्टेंबर रोजी कारंजा येथील प्रत्येक कॉलेनी वसाहतीतील संत श्री. गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आनंदोत्साहात पार पडणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवार भाद्रपद शु. अनंत चतुर्दशीला दि.17 सप्टेंबर रोजी बाप्पांचे मोठ्या थाटात विसर्जन होऊ घातलेले आहे. त्या निमित्ताने कारंजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी,श्रींचे भक्त आणि कारंजेकर नागरीकांना श्रींच्या सण उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच श्रींच्या भाविक मंडळी आणि कारंजेकरांनी, "आपले सण उत्सव साजरे करतांना शांती सुव्यवस्था भंग पावणार नाही याची काळजी घेण्याचे आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.