अकोला:- ९ ऑगस्ट क्रांतीदिन व संगीत सूर्य केशवराव भोसले जयंतीदिना निमित्ताने मराठा सेवा संघ अकोला जिल्हा कार्यकारिणीची मासिक सभा दि .९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाध्यक्ष मा .डॉ. रणजित कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय कोषाध्यक्ष मा. अशोकराव पटोकार, सांस्कृतिक परिषदेच्या महासचिव मा. शिवमती प्रमीलाताई भिसे ,राज्य उपाध्यक्ष देवेंद्रजी देशमुख,जिल्हाध्यक्षा डॉ .वंदनाताई मोरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रेणूताई गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ सांस्कृतिक भवन, मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालय, अकोला येथे संपन्न झाली. सर्व प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, संगीतसूर्य केशवराव भोसले, क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिजाऊ वंदना डॉ. वंदनाताई मोरे व प्रमिलाताई भिसे यांनी सादर केली. त्यानंतर संगीतसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या जिल्हाध्यक्ष डॉ.वंदनाताई मोरे,महासचिव प्रमिलाताई भिसे,राज्य उपाध्यक्ष देवेंद्र देशमुख, मसेसं चे ज्येष्ठ मार्गदर्शक देवराव पाटील हागे यांनी केशवराव भोसले व क्रांतिवीरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला मराठा सेवा मराठा सेवा संघाचे जेष्ठ सदस्य दादाराव पाथ्रीकर यांचा याप्रसंगी त्यांचे वाढदिवस व एकसष्टी निमित्त मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवश्री ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचा "पहिली अमेरिका वारी" हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानतंर जिल्हा कार्यकारिणीच्या मासिक सभेला सुरवात झाली सभेत पुढील विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंती निमित्त दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले तसेच मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कुटुंब मेळावा आयोजना बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली या समितीमध्ये शिवश्री श्रीकांत बिहाडे, विजयराव देशमुख , किशोर हिंगणे, रेणूताई गावंडे, पंकज जायले, राजेश पाटील, डॉ. निलेश मोहोड यांचा समावेश करण्यात आला तसेच मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ वस्तीगृह करिता व्यवस्थापन समितीची सुद्धा याप्रसंगी निवड करण्यात आली या समितीमध्ये डॉ. सीमाताई तायडे, रेणूताई गावंडे ,जयश्रीताई जायले, इंदुताई देशमुख, सविताताई कुटे, स्वातीताई हिंगणकर, कल्पनाताई साबळे यांचा समावेश करण्यात आला. जिल्हाध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व आयोजित दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमास मुख्य सल्लागार तथा ज्येष्ठ मार्गदर्शक मा. डॉ.पुरुषोत्तम तायडे,बाबासाहेब , गावंडे, विजयराव देशमुख, दिवाकरराव पाटील, श्रीकांत बिहाडे,कार्याध्यक्ष किशोर हिंगणे, विठ्ठल गाढे,सुनील जानोरकर, संतोष भोरे,उपाध्यक्ष अरुण गावंडे, डॉ विजयराजे ताले,राजेश पाटील, जिल्हा सचिव प्रा.संदीप निर्मळ,सहसचिव आनंद पाटील सुकळीकर, अमोल पटोकार, कोषाध्यक्ष अतुल अंधारे,सहकोषध्यक्ष संजय इंगळे, विभागीय सदस्य प्रा.दिलीप आंबेकर, विशेष निमंत्रित अधिकारी गणेश डहाळे,कार्यकारिणी सदस्य इंजि. आशुतोष सोनोने, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. निलेश मोहोड वधुवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर सपकाळ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. नमन आंबेकर, माजी जिल्हाध्यक्ष पंकज भाऊ जायले, विठ्ठलराव गावंडे, दिवाकर देशमुख, गणेश वक्ते ,प्रज्वल तायडे, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष मृदुलाताई गावंडे, जिल्हा सचिव अंजलीताई ठाकरे ,स्वातीताई हिंगणकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे आजी-माजी पदाधिकारी ,आजीवन सदस्य,कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.निलेश मोहोड तर सभेचे सूत्र संचालन जिल्हा सचिव प्रा.संदीप निर्मळ यांनी केले व आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष विठ्ठल गाढे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....