कारंजा : संपूर्ण भारतामध्ये दोन आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्थान असलेले कारंजा शहरातील मातृशक्ती उपसकांच्या कुलस्वामिनी आई कामाक्षा मातेचे,स्थानिक नगर पालिकेजवळ गोंधळीनगर येथे श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजा हे भव्य मंदिर असून येथे सालबादप्रमाणे नवरात्रोत्सवा निमित्त, दानशूर अन्नदाते आणि भाविकांच्या सहकार्यातून महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मंगळवार दि. 31 ऑक्टोंबर 2023 रोजी सर्वप्रथम कुलस्वामिनी आई कामाक्षा मातेची महाआरती करण्यात आली.त्यानंतर कारंजाचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तराज डहाके यांच्या हस्ते प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आई कामाक्षा माताचे पुजारी दिगंबर महाजन व महाजन परिवार,कामाक्षा मातेचे गोंधळी कडोळे कमलेश कडोळे, दिनेश कडोळे,परिसरातील भाविक भक्त मंडळी हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी कारंजातील असंख्य हजारो भाविकांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री उशिरा पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता.