वर्तमान स्थितीत महागाईमुळे भल्याभल्यांचे कंबरडे मोडले आहे. तिथे बिचाऱ्या निराधारांचा गुजारा कसा ? हा प्रश्नच आहे. पण तरीही, शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार योजनेतून मिळणाऱ्या, तुटपुंज्या अर्थसहाय्याच्या आशेवर तिन - तिन महिने निराधार व्यक्ती चातक पक्षाप्रमाणे आशा लावून बसतात. निराधार निवृत्ती वेतन मिळते तो एक दिवस यांच्या करीता आनंदोत्सवाचा असतो. त्या दिवशी त्यांची अर्थकारणाची समिकरणे ठरून इतर दिवस परत पुढील हफ्त्याची प्रतिक्षा करण्यात जातात. त्यातूनच निराधारांचा उदरनिर्वाह आणि औषधोपचार चालत असतो .शासन सद्य स्थितीत वयोवृद्ध, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या व दुर्धर आजार ग्रस्तांसाठी ही योजना चालवीत असते आणि म्हणूनच खरेतर या योजनेच्या लाभार्थ्यांकडून शासनाने, "उत्पन्नाचा दाखला' मागणेच मुळात विचित्र वाटते . बरे सध्या चहाचा कप १० रु .ला, खानावळीचे जेवण १०० रु ला, रिक्क्षाभाडे कमीतकमी २० रु ., रुग्नालयाच्या सर्जनची तपासणी शुल्क कमितकमी २०० रु, औषध गोळी १० रु नग . एवढे जरी गृहीत धरले तरी एका निराधाराला जगण्यासाठी कमितकमी दहाहजार रु . महिना तरी हवा आहे . तुटपुंज्या निवृत्ती वेतनामुळे बरेचसे निराधार भिक्षुगीरी करून किंवा एखाद्या मध्यमवर्गीयाकडे छोटी - मोठी मोलमजूरी करून संसाराचा गाडा हाकत असतात. अशा परिस्थितीत शासन त्यांना एकविस हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मागते. परंतु अनेक तलाठी, पटवारी किंवा मंडल अधिकारी व स्वतः तहसिल कार्यालय सुद्धा त्यांना एकविस हजार रुपये उत्पन्न द्यायला तयार होत नाही.त्यामुळे गरजू व्यक्ती रडकुंडीला येतात.
संबधित पटवाऱ्यांनी यावेळी निराधारांना २१००० रु वार्षिक उत्पन्नाचे जर दाखले दिले नाहीत तर शेकडो लाभार्थांच्या विशेष सहाय्य योजनेचे निवृत्ती वेतन बंद होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे, "शासनाने व मुख्य म्हणजे तलाठी, पटवारी किंवा मंडल अधिकाऱ्यांनी त्यांचे विषयी सकारात्मकता ठेवीत दयामाया बाळगून अगदी उदार अंतःकरणाने प्रत्येक निराधार, वयोवृद्ध, दिव्यांग, विधवा महिलां लाभार्थांची यादी पाहून, त्यांना घरपोच, २१००० रु . उत्पन्नाचे दाखले देऊन संबंधित तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागात सादर करावेत ." असी मागणी स्थानिक समाजसेवी तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाद्वारे संबधित तलाठी, पटवारी, मंडल अधिकारी व तहसिलदार कारंजा यांना केली आहे .