संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शगाव म्हणून नाव लौकिक मिळवलेले शिरोळ तालुक्यातील मौजे धरणगुत्ती येथे ग्रामपंचायत धरणगुत्ती आणि शाखा डाकघर, धरणगुत्ती (कोल्हापूर डाक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत डाक सप्ताहाच्या निमित्ताने जगभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवन व कार्य यांच्या गौरवार्थ टपाल विभागाच्या वतीने प्रकाशित झालेल्या टपाल तिकिटांचे एकदिवशीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी उद्घाटक मा. श्री. उद्यानपंडित गणपतराव पाटील साहेब (चेअरमन - श्री. दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ) यांच्या शुभहस्ते टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शंकरराव कवितके (गटविकास अधिकारी वर्ग १ - पंचायत समिती, शिरोळ), मा. श्री. शेखर कलगोंडा पाटील, (माजी सरपंच / विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, संचालक - श्री. दत्त साखर, शिरोळ), मा. श्री. राहुल आंबी (पोस्टमास्टर, डाकघर - नांदणी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शन सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
सदर प्रदर्शनाच्या आयोजनासाठी शाखा डाकघर, धरणगुत्तीचे पोस्टमास्तर संजय हुक्कीरे आणि कोल्हापूर डाक विभाग यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभले.
टपाल तिकीट संग्राहक - प्रिन्स सुनील पाटील आणि पाटील दांपत्य (धरणगुत्ती) यांनी संकलित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या जीवनावरील टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाला भेट देऊन जास्तीत जास्त व्यक्ती आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा यासाठी सरपंच - श्रीमती विजया देवाप्पा कांबळे, उपसरपंच - विलास बाळू जाधव, ग्रामविकास अधिकारी - चंद्रकांत मधुकर केंबळे यांनी आवाहन केले आहे.