पुणे दि. पुणे अहमदनगर रोडवरील भीमा कोरेगाव येथुन सात किलो मीटर अंतरावर असलेल्या वढु गाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील गोविंद गोपाल सराफ महार हे सैनिक होते औरंगजेबच्या सैन्याने धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजी राजे भोसले यांची निर्गुण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते तुकडे अनेक ठिकाणी फेकून दिले होते त्या तुकड्यांना गावातील कोणत्याही व्यक्तीने हात लावला किंवा एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी महाराज यांच्या प्रमाणे त्या व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात येणार अशी सूचना दवंडी औरंगजेबच्या सैनिकांनी दिली होती या सूचने मुळे वडो गावातील कोणत्याही जाती-धर्माचा व्यक्ती पुढे येत नव्हता नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्याचे किल्लेदार आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाला सन्मानपूर्वक अग्नी देणारे वडु येथील रहिवासी गोविंद गोपाल गायकवाड या व्यक्तींनी आपल्या जीवाची बाजी लावून पुढाकार घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे फेकलेले तुकडे एकत्र करून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडू येथे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले आज त्या जागेवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची अशी भव्य दिव्य सन्मानपूर्वक समाधी उभी आहे
शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात बहुजन समाज अंधश्रद्धेला बळी पडला असून मराठा समाज जातीवादी घोरपडला असून औरंगजेबांच्या सैनिकांचा आदेश मोडीत काढून धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले यांचे फेकून दिलेले तुकडे ज्या गोविंद गोपाल गायकवाड यांनी एकत्र करून सन्मानपूर्वक संभाजी महाराज यांना अग्नी दिला त्याच गोविंद गोपाल गायकवाड यांची समाधी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी जवळ आहे, मराठा समाजाने जातीभेद करून छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे बांधली आणि ज्या मराठा समाजाचे छत्रपती संभाजी राजे होते त्या समाजाने आपल्या राज्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुठलाही समाज बांधव पुढे आला नव्हता अशा या मराठा जातीवादी समाजाने गोविंद गोपाल गायकवाड यांच्या समाधीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे
तेव्हा या सर्व परिस्थितीचा विचार करून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी नुकतीच वडू येथील संभाजी महाराजांच्या समाधीला भेट देऊन व नतमस्तक होऊन अभिवादन केले तर याच ठिकाणी रोडच्या पलीकडे महार वस्तीमध्ये गोविंद गोपाल गायकवाड यांची सुद्धा समाधी आहे गोविंद गायकवाड यांची समाधी जमिनीपासून एक ते दोन फुटावर व तीन ते चार फुटाच्या ओट्याप्रमाणे आणि वर तीन पत्राचे शेड अशा अवस्थेमध्ये गोविंद गायकवाड यांची समाधी आहे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी गोविंद गायकवाड यांचे वंशज असलेल्या पांडुरंग बाळु गायकवाड आणि कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा करून वढु येथील गोविंद गायकवाड यांची समाधी सुद्धा धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रमाणेच येथे राज्यसरकारने बांधावे याकरिता बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे हे लवकरच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हा आयुक्त पुणे जिल्हा अधिकारी शिरूर तालुका तहसीलदार आणि संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे निवेदन देऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी प्रमाणे गोविंद गायकवाड यांची समाधी सुद्धा बांधावी जर का राज्य शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले तर राज्यातील सर्व बौद्ध समाज एकत्रित करून बहुजन जनता दल खर्चाने गोविंद गोपाल गायकवाड यांची समाधी बांधणार वरील दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी कळविलेले आहे.