वाशिम : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या अथक मागण्यामुळे आणि दि.24 जानेवारी 2024 च्या "विराट क्रांतिकारी धरणे आंदोलनामुळे" अखेर महाराष्ट्र शासनाला संघटनेच्या विविध मागण्या मान्य करावा लागल्यात. उल्लेखनिय म्हणजे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे आणि त्याचे सहकारी यांनी वेळोवेळी सरकारमधील मंत्री व त्यांचे खाजगी सचिव यांचेशी संवाद ठेवला. केन्द्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले,उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे अव्वल सचिव अमोलजी पाटणकर यांना प्रत्यक्ष भेटीमध्ये "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळा" सार्वत्रिक निवडणूकापूर्वी घेण्याची गळ घातली.त्यामुळेच अखेर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने विजेते पुरस्कारार्थी जाहिर करीत दि 12 मार्च 2024 रोजी जमशेदजी भाभा नाट्यगृह नरिमन पॉईन्ट मुंबई येथे पुरस्कार समारंभ आयोजीत केला. याकरीता विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटी,शासनाच्या ईमेल आयडी वर आणि पोष्ट ऑफिस द्वारे रजिस्टर पत्र पाठवून, आणि महत्वाचे म्हणजे "वेळोवेळी सर्व लहानमोठ्या वृत्तपत्रांचे अथक सहकार्याने बातम्या देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आयोजना करीता सततचा पाठपुरावा केला. त्याकरीता अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक आणि मी स्वतः सुद्धा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंतजी भांगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचेशी चर्चा करून मागणी केली." हे त्याचेच फलित असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदिप वानखडे यांनी म्हटले आहे.