संत महात्म्यांचा आशीर्वाद गुरुजनांचा सहवास हा कल्याणकारी असून संत गजानन महाराज भास्कर महाराज नरसिंह महाराज यांची कृपा पात्र महाराज वासुदेव महाराज यांच्या जयंती आणि पुण्यतिथी या निमित्ताने सातत्याने आशीर्वाद प्राप्त करण्याचा सौभाग्य मिळणे मंचावर गोसेवक व विविध पुरस्काराने सन्मानित संजय महाराज पाचपोर यांचा आशीर्वाद सानिध्य हे सौभाग्याचे लक्षण असल्याचे खासदार अनुप संजय धोत्रे यांनी केले.
खासदार अनुप धोत्रे यांचा माऊली गुरुमाऊली संत वासुदेव महाराज यांच्या 108 व्या जन्मोत्सव निमित्त श्रीक्षेत्र श्रद्धासागर इथे भक्तीमुळे वातावरणात सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होतेश्रध्दासागर येथे झालेल्या कार्यक्रमात युवा खासदार अनुप धोत्रे, हभप संजयमहाराज पाचपोर, संस्थान चे अध्यक्ष वासुदेव महाराज महल्ले,बंडू पाटील हिंगणकार, साहेबराव मंगळे,गजाननराव चोपडे,यांचेसह राजेश नागमते,राजेश रावनकर गोपाल मोहोड श्रध्दासागर चे सर्व पदाधिकारी,जिल्ह्यातील भाविक मंडळी,हभप मंडळी यासह हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होतेयावेळी संजय महाराज पाचपोर व खासदार अनुप धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुमाऊली यांच्या आशीर्वाद भक्ती आणि श्रद्धा विश्वासासोबत असल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आलो असता मला लोकसभेची तिकीट मिळाल्याची जाहीर झाले हा गुरूंचा आशीर्वाद असल्यास काय होऊ शकते हे कृतीने सिद्ध झाले आहे जागृत गुरु माऊली यांचे स्थान श्रद्धा सागर हे त्यांना इच्छापूर्ती करणारा असल्याची खासदार अनुप धोत्रे यांनी सांगून, परम पूज्य गुरुमाऊली वासुदेव महाराज यांनी आपला आयुष्य जीवन वारकरी आणि सनातन धर्मासाठी मानवतेसाठी अन्नदान सोबत सामाजिक दायित्व म्हणून शिकवण दिली त्यांचे विचार आजही आत्मसात करणे योग्य असल्याचे सांगून परमपूज्य गोसेवक व समाज जागृती चे काम करणारे संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त ह भ प संजय महाराज पाचपोर यांनी आपला आयुष्य जीवन समाज राष्ट्राला दिलाय असून त्यांच्या हस्ते माझा सत्कार हा मला आशीर्वाद व विकास कामासोबत मानवता धर्म शिकवणारा असं असल्याचीही खासदार धोत्रे यांनी यावेळी सांगितले.