भद्रावती- तालुक्यातील ढोरवासा केंद्रांतर्गत नवरत्न स्पर्धा नुकतीच जिल्हा परिषद शाळा कुणाडा येथे आयोजित करण्यात आली.
तालुक्याचे शिक्षण विभागाचे प्रेरणास्थान मा. डॉ. प्रकाशजी महाकाळकर साहेब गटशिक्षणाधिकारी भद्रावती यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने नुकतीच विद्यार्थ्यांच्या नऊ प्रकारच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात स्पर्धा घेऊन नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या गेली यात चिरादेवी च्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने अकरा प्रकारात बक्षीस मिळवून केंद्रातून अव्वल स्थान पटकावले, तर गवराळा शाळेने सात प्रकारात बक्षीस मिळवून द्वितीय राहण्याचा मान मिळविला.
वैयक्तिक प्राथमिक गटात आरोही नगराळे ढोरवासा तर
उच्च प्राथमिक गटात महेक शेख गवराळा, मनस्वी ताजने चिरादेवी यांनी सर्वाधिक बक्षिसे जिंकले
यात विद्यार्थ्यांनी कथाकथन स्पर्धा, स्वयंस्फूर्त भाषण, वादविवाद स्पर्धा, एकपात्री भूमिका, बुद्धिमापण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,स्वयंफुर्त लेखन, स्मरणशक्ती स्पर्धा अश्या नऊ प्रकारच्या स्पर्धेत केंद्राच्या सर्व जिल्हा परिषद अकरा शाळांनी आपला सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अतुल बडकेलवार सर, प्राचार्य साई कॉन्व्हेंट कुणाडा, उदघाटक सुरेश बावणे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कुणाडा तर प्रमुख अतिथी म्हणून शंकर श्रीखंडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कुणाडा, भारतजी गायकवाड सर केंद्रप्रमुख ढोरवासा, श्री एस. एच. मानकर सर, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा, कु. ज्योती नाकाडे मॅडम मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, कुणाडा, नंदू खोंडे सर गटसमन्वयक भद्रावती हे लाभले होते.
मान्यवरांनी गाडगे बाबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमला विधिवत सुरुवात केला.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत केंद्रप्रमुख गायकवाड सर यांनी या स्पर्धेचा मुख्य उद्देश आणि नवरत्न स्पर्धेचे नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले सोबत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व कलागुणांना मंच उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी जगातील स्तरावर गावाचे व शाळेचे नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले.
उत्तरोत्तर उल्लास मेळाव्याच्या आयोजनाची मेजवानी पण कार्यक्रमाला लाभली याअंतर्गत स्वयंसेविका दिशा कावठी यांच्या मार्गदर्शनाखाली नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावातील जेष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या अतिथी नाकाडे मॅडम यांनी या स्पर्धेची रूपरेषा सांगत असताना विविध उदाहरण देऊन नवरत्न स्पर्धेत तुम्ही भविष्यात कलागुणांनी संपन्न नागरिक व्हाल असे प्रतिपादन केले, शिक्षनासोबत चांगला नागरिक पण महत्वाचा असतो असे त्यांनी सांगितले.
यानंतर मुधोली केंद्राचे पळसगाव शाळेचे शिक्षक दिवाकर कुमरे सर यांचे आकस्मित निधनाबद्दल मौन बाळगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात बडकेलवार सरांनी विद्यार्थ्यांना लता मंगेशकर सारखे गाणे सचिन तेंडुलकर गाऊ शकत नाही व सचीन सारखे क्रिकेट लता दीदी खेळू शकत नाही म्हणून नवरत्न स्पर्धेमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन द्या असे प्रतिपादन केले.
या स्पर्धेत प्राथमिक गटात कथाकथन स्पर्धा
प्रथम पुरस्कार शिवण्या आवारी घोनाड,
द्वितीय पुरस्कार सक्षम काकडे चिरादेवी,
स्वयंस्फूर्त भाषण
प्रथम पुरस्कार प्रज्वल खापणे गवराळा,
द्वितीय पुरस्कार अवनी ताजने चिरादेवी,
वादविवाद स्पर्धा
प्रथम पुरस्कार ऐश्वर्या मुठलकर चिरादेवी,
द्वितीय पुरस्कार यश उगे मुरसा,
एकपात्री भूमिका
प्रथम पुरस्कार हर्षल उगे घोनाड,
द्वितीय पुरस्कार कृष्णा मिटपल्लीवार गवराळा,
बुद्धिमापण स्पर्धा
प्रथम पुरस्कार आरोही नगराळे ढोरवासा,
द्वितीय पुरस्कार प्रणय पायपरे तेलवासा,
चित्रकला स्पर्धा
प्रथम पुरस्कार रोशन मेश्राम कुनाडा,
द्वितीय पुरस्कार प्रणय पायपरे, तेलवासा,
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
प्रथम पुरस्कार आरोही नगराळे ढोरवासा,
द्वितीय पुरस्कार प्रार्थना कडुकर पिपरी,
स्वयंफुर्त लेखन
प्रथम पुरस्कार आरोही नगराळे ढोरवासा,
द्वितीय पुरस्कार अवनी ताजने चिरादेवी,
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रथम पुरस्कार दिव्या आस्कर कुनाडा,
द्वितीय पुरस्कार शिवण्या आवारी घोनाड
उच्च प्राथमिक गटात
कथाकथन स्पर्धा
प्रथम पुरस्कार साईप्रणाली आत्राम ढोरवासा,
द्वितीय पुरस्कार सोमेश्वरी खुटेमाटे पिपरी,
स्वयंस्फूर्त भाषण
प्रथम पुरस्कार फाल्गुनी जेऊरकर गवराळा,
द्वितीय पुरस्कार रक्षक जीवतोडे चिरादेवी,
वादविवाद स्पर्धा
प्रथम पुरस्कार महेक शेख गवराळा,
द्वितीय पुरस्कार सक्षम मुठलकर चिरादेवी,
एकपात्री भूमिका
प्रथम पुरस्कार ईशा धाडसे गवराळा,
द्वितीय पुरस्कार आयुष उरकुडे चिरादेवी,
बुद्धिमापण स्पर्धा
प्रथम पुरस्कार रक्षक जीवतोडे चिरादेवी,
व्दितीय पुरस्कार श्रावणी निमकर ढोरवासा,
चित्रकला स्पर्धा
प्रथम पुरस्कार कुलेश्वरी सातपुते घोनाड,
द्वितीय पुरस्कार अंशुमन गोंडे गवराळा,
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
प्रथम पुरस्कार सोमेश्वरी खुटेमाटे पिपरी,
द्वितीय पुरस्कार मनस्वी ताजने चिरादेवी,
स्वयंफुर्त लेखन
प्रथम पुरस्कार महेक शेख गवराळा,
द्वितीय पुरस्कार मनस्वी ताजने चिरादेवी,
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रथम पुरस्कार समृद्धी बेलखुडे कुनाडा,
व्दितीय पुरस्कार गौरव कांबळे चिरादेवी यांना प्रदान करण्यात आला
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जांभुळकर सर यांनी केले तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्या. नाकाडे मॅडम, वनिता बलकी मॅडम, प्रशांत जांभुळकर सर, स्वप्नील बेलखुडे सर गावकरी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....