पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी येथे दाखल विविध चोरीचा गुन्ह्यातील आरोपींना पोलीसांनी पकडुन त्यांचेकडुन चोरीच्या माल हस्तगत करण्यात आला.
माहे ऑगस्ट २०२२ मध्ये पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दाखल विविध बोरीच्या गुन्हयातील आरोपींना पोलीसांनी पकडून त्यांचेकडुन चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला.
(१) मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी नामे अनिल संपत शिउरकर रा. वडसा यांचेकडुन स्प्लेंडर मोटारसायकल कि. ३०,०००/- रु. जप्त करण्यात आली.
२) दिनांक ०२/०८/२०२२ रोजी आवळगाव येथील दाखल चोरीच्या गुन्हयातील आरोपी परमेश्वर उर्फ नागेश तुळशिराम मसराम स. शिवणफळ तह. समुद्रपूर जि. वर्धा याचेकडुन सोन्याचे दागीने व नगदी रक्कम एकुण कि. ३९,३००/- रु. चा माल जप्त करण्यात आला.
(३) डीझेल चोरीतील आरोपी नामे प्रकाश टेंगरे व पवन जराते रा. अ-हेरनवरगाव यांना अटक करून त्याचेकडुन २८००/- रु. वा डिझेल जप्त करण्यात आला.
वरील तीन्ही गुन्हयातील आरोपींना पकडुन गजाआड करण्यात पोलीसांना यश आले आहे. वरील सर्व गुन्हयांचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / प्रशांत ठवरे, अनिल कुमरे, पोहवा / अरुण पीसे, हरीदास सुरपाम, नापो / मुकेश गजबे, योगेश शिवनकर, खुशाल उराडे, पवन डाखरे, पोशि/ अनुप कवठेकर, चंद्रशेखर कामडी, नरेश कोडापे, विजय गेंद, संदेश देवगडे, अजय कटाईत यांनी केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....