आरमोरी :- युवारंग तर्फे दिनांक २६ एप्रिल २०२३पासून सुरू झालेल्या निशुल्क समर कॅम्प मध्ये आज दिनांक २८ एप्रिल २०२३ शुक्रवार ला कराटे प्रशिक्षक मा. राजुजी अतकरे सर , मा.मनोज गेडाम सर ,चारूदत्त राऊत सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना कराटे चे प्रशिक्षण देण्यात आले ज्यामध्ये अपरस्पंच, लोवरस्पंच,मिडलस्पंच,अपरब्लॉक,लोवरब्लॉक,मिडलब्लॉक ,पॉवर पंच,कराटे काता व विद्यार्थ्यांनी अडचणीच्या प्रसंगात कराटे चा उपयोग करून स्वताचे रक्षण करून शत्रूवर आक्रमण कशे करावे याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली याप्रसंगी युवारंग निशुल्क समर कॅम्प चे संयोजक रोहित बावनकर,युवारंग चे सदस्य पंकज इंदूरकर यांनी विशेष सहकार्य केले.