वाशिम : बळीराजा शेतीची नांगरणी वगैरे मशागतीची कामं आटोपून,पेरणीसाठी सज्ज झाला आहे. शेतिपयोगी बि बियाणे आणि खरेदी करीता बाजारपेठेत बळीराजाची तुंबळ गर्दी उसळत आहे.आता पेरणीकरीता बळीराजाला चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.चालू आठवड्यात, सतत दोन तिन दिवस दमदार पाऊस झाल्यास यंदा मृग नक्षत्रातच पेरण्या सुरु होण्याचा अंदाज ज्येष्ठ शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.त्यामुळे "येरे येरे पावसा . . . . " म्हणत बळीराजा पर्जन्य राजाला आर्त अशी साद घालत असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी शेतकरी मित्र संजय कडोळे यांनी कळवीले आहे.