गडचिरोली जिल्हा हा दुर्गम मागास जिल्हा असल्यामुळे येथील आदिवासी जंगल कामगार संस्थाच्या सभासदाना शासनाकडून त्यांचे कार्यक्षेत्रातील जंगल वनविभागाने मारकिंग करून वाटप करीत होते. त्यावर सस्था सभासद व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागाने कुप तोडाईचे काम करून संबंधीताच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यात येत होता परंतु सन 2023 पासून वडसा वनविभागातील वकिंग प्लान (कार्य आयोजना ) बंद झाल्याने येथील जगल कामगार संस्था सभासदांना व स्थानिक ग्रामस्थांना कुपकामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. संस्थेला जंगल कटाई व्यतिरिक्त कोणतेच काम नसल्यामुळे सभासद व स्थानिक ग्रामस्थांना उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात सभासद तसेच संस्थेचे कर्मचारी यांच्यावर आर्थिक अडचण निर्माण होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर वर्किंग प्लान (कार्य आयोजना) मंजूर करून कुप कटाईचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी जंगल कामगार संघटना वनविभाग वडसाचे पदाधिकारी यांनी नागपूर येथील महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक बी.एस.हुडा यांची आज भेट घेऊन गडचिरोली वनवृतातील वडसा वनविभागातील वर्किंग प्लान लवकरात लवकर मंजूर करून जंगल कामगार सहकारी संस्था ना कुप कटाईचे कामे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी प्रेरणा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था वडधा चे अध्यक्ष मानिकराव सिडाम. श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा चे अध्यक्ष दिलीप घोडाम. कमविर वनमजुर सह संस्था विसोरा चे अध्यक्ष गुरुदेव नैताम . श्रीराम जंगल कामगार सहकारी संस्था पळसगाव चे अध्यक्ष गिरीधर घोडाम. श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे . उपाध्यक्ष हिराचंद गेडाम.सचालक मुखरु खेवले यांसह असंख्य जकास पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक बी.एस.हुडा यांनी सांगितले की वर्किंग प्लान समाधी याच महिन्यात मिटीग होणार होती परंतु काही अपरिहाद कारणांमुळे रद्द झाली परंतु आमचे प्रयत्न सुरू आहेत. असे आश्वासन दिले.