अकोला :-केंद्रीय विद्यालय अकोल्यात मंजूर करण्यात आल असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्रातील केंद्र उभारणीत मंजुरी देण्यात आली आहे त्यामध्ये अकोल्याचा समावेश करून खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. माजी खासदार व माजी मंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांनी यासाठी प्रयत्न केले होते आणि जिल्हा परिषद येथील आगरकर कन्या विद्यालय येथे पाच रूम या विद्यालयासाठी उभारणी केली होती व जिल्हा परिषद त्याला मंजुरी दिली होती तसेच कौलखेड खडकी परिसरात पाच एकर जागा या विद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय विद्यालयाचा मार्ग सुरू करण्याचा सुकर झाला आहे. सातत्याने यासाठी तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे प्रयत्नशील होते आणि त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली होती परंतु प्रकृतीच्या कारणाने विद्यार्थी विद्यालय उभारणीचं काम राहिलो होतो परंतु खासदार अनु प धोत्रे यांनी अकोले करायची मागणी संजय भाऊ धोत्रे यांच्या पाठपुराव्याला गती देऊन सहा महिन्यात केंद्र मंजूर करून आणून अकोलेकरांची मागणीची पूर्तता केली आहे यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा आभार व्यक्त केले आहे यासाठी प्रयत्न करणारे आमदार रणधीर सावरकर यांची सुद्धा त्यांनी आभार अभिनंदन करून शहराच्या विकासासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे असलेल्या समस्या तातडीने सोडून रेल्वे, बांधकाम तसेच विविध क्षेत्रातील मागण्या पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी अभिवचन खासदार अनुप धोत्रे यांनी दिले.