ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे. या शाखेचे व्यवस्थापक चिंतामण वासनिक कार्यरत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खातेदार आहेत. बँकेचा खातेदार व्यवहार करण्याकरिता गेले व्यवस्थापक वासनिक असभ्य बोलतात. खासदाराचे व्यवहार करत नाहीत त्यांच्याशी बोलताना अपमानजनक बोलतात त्यामुळे खासदारांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उदापूर येथील ग्रामस्थांनी स्टेट बँकेकडे मोर्चा वळविला होता. त्यांच्या या वागणुकीमुळे बऱ्याच खातेदारांना त्रास होत आहे त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक चिंतामण वासनिक यांची तात्काळ बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारतीय स्टेट बँक शाखा उदापूर येथे आजूबाजूच्या गावातले बरेच खातेदार आहेत. त्यांच्याशी सुद्धा योग्य प्रकारे वागत नाही. यापूर्वीसुद्धा ग्रामस्थांनी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा उदापुरला घेराव घेतला होता परंतु व्यवस्थापकाच्या वागणूक मध्ये बदल झालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांनी या वेळेत योग्य पाऊल उचलून भारतीय स्टेट बँक बंद करण्याची मागणी केली. सदर व्यवस्थापंक चिंतामण वासनिक यांची तात्काळ बदली न केल्यास बँके समोर उपोषण व आंदोलन करण्यात येईल अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.