दिनांक 9 /8 /2023 रोजी जिल्हा परिषद वाशिम येथील महात्मा फुले सभागृह येथे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, (माध्यमिक),वेतन पथक अधीक्षक यांच्या समवेत व अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार मा.श्री किरण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन केलेले आहे. ही सभा सकाळी ठीक 11:30 वाजता आयोजित केलेली आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींना नम्र विनंती तथा आवाहन करण्यात येते की, आपल्या काहीही शैक्षणिक समस्या तसेच कार्यालयीन स्तरावर प्रलंबित प्रस्ताव असल्यास आपण निवेदनासह या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.