कारंजा :-अमरावती येथील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विभागीय 14 व 17 वर्षीय गटाची मिनीगोल्फ स्पर्धा नुकतीच पार पडली.या स्पर्धेत बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश प्राप्त केल्याने यातील 3 विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
या स्पर्धेत 14 वर्षीय मुलींच्या गटात सिंगल इव्हेंटमध्ये कु.शिवानी करडे हिने सुवर्णपदक पटकावले. तर 17 वर्षीय मुलींच्या गटात कु.मुक्ता कापसे व 17 वर्षीय मुलांच्या गटात आदित्य ठाकरे हे दोन विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
विशेष बाब म्हणजे 17 वर्षे मुलींचा टिम इव्हेंट मध्ये मुलींचा संघ अंतिम सामन्यात उपविजेता राहिला.या संघातील कु.तनुजा कोपरकार, कु. समिक्षा सराफ, कु.वैष्णवी लबडे,कु.अमृता कापसे,कु. साक्षी करडे,कु.प्रिया पारे,कु. रुतुजा कदम,कु.श्रेया इंगळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेता पदापर्यंत मजल मारली.
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी 03 सुवर्ण पदकांची कमाई करून राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्रता मिळवली त्याबद्दल समस्त गांवकरी मंडळी कडून कौतुक होत आहे. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेकडे दिल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले. तसेच
विजयी खेळाडुंचे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर, संस्थाध्यक्ष केशवराव खोपे,संचालक देविदास काळबांडे, मुख्याध्यापक विजय भड व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे. विजयी खेळाडुंनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक राजेश शेंडेकर यांना दिले. मुख्याध्यापक विजय भड यांनी सुवर्ण पदक प्राप्त तिन्ही विद्यार्थ्यांच्या अतुलनीय कामगिरी बद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....