कारंजा (लाड) : येथील दारव्हा रोडवरील दुंडा भगत टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले पतंजली महिला जिल्हाध्यक्ष डॉ सौ अर्चना कदम यांनी आपल्या वाढदिवशी वाढदिवसाची कोणतीही औपचारिकता न करता पतंजलीच्या पदाधिकारी व योग प्रेमी महीलांसमावेत 30 झाडांचे रोपण केले यामध्ये बेल ,शमी, वड, उंबर, पिंपळ, लिंब ,कडू बदाम,जांभूळ, गुलमोहर कडुनिंब अशा विविध जातीची झाडे लावली . वाढदिवशी मॅडमनी कारंजाच्या सर्व जनतेला विविध संस्था सर्व बचत गट यांना वृक्ष लावण्याकरिता आवाहन केले तशाप्रकारे लवकरच सर्व संस्था मिळून टेकडीवर भव्य वृक्षारोपण प्रोग्राम घेण्यात येईल अशी ग्वाही अर्चना कदम यांनी दिली व उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले याकरिता पतंजली तहसील प्रभारी प्रतिभाताई वानरे, कामाक्षा सोने माया धोटे माला चव्हाण, प्रतिभा गुल्हाने, वर्षा भुजबळे ,एकता गायकवाड, चित्रा पानझडे ,निशा कुमकर , पापडे ताई शंकरपुरे ताई उपस्थित होत्या .झाडे लावू झाडे जगवू सजवू वसुंधरा वसुंधरेच्या रक्षणासाठी हाच नारा खरा !