ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरात आज विदर्भ राज्य युवा आघाडी समिती व युवामित्र सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था ब्रम्हपुरी याच्या माध्यमातून नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय रोडवर थंड पाणपोई सुरू करण्यात आली.
या पाणपोई चे उध्दघाटन ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुभंरे तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोविंदराव भेंडारकर याच्या हस्ते फित कापुन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी शहराचे तापमान सर्वाधिक असुन शहरात अनेक नागरिक शासकीय व खाजगी कामासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी सुध्दा शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येत असतात. अनेक विद्यार्थी पाण्यासाठी भटकंती करताना बघायला मिळत असल्याने विदर्भ राज्य युवा आघाडी ब्रम्हपुरी चे तालुकाध्यक्ष योगेश नंदनवार यांनी सामाजिक बांधिलकी जपुन पाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. आणि या देणगी पासून कोणीही तहानेला नागरिक वंचित राहू नये व शहरातील उष्णता बघून शहरात पाणपोई सुरू करण्याची संकल्पना मनात घेऊन तहानलेल्या नागरिकांन साठी थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली.
योगेश नंदनवार यांनी आपल्या समाज कार्याचा पुन्हा एकदा परिचय करून दिला आहे. पुढील नव्वद दिवस नागरिकांना या थंड पाणपोई मधील पाणी प्यायला मिळणार असून या सदर उपक्रमाबद्दल दोन्ही संघटना चे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी केवळराम टिकले, अमर गाडगे पत्रकार, पंकज टिकले, अरविंद नागोसे, तेजस गायधने, विठ्ठल टिकले, सौरभ सुर्यवंशी, निखिल डांगे, प्रशांत नंदनवार, राहुल पत्रे आदी नागरिक उपस्थित होते.