कारंजा : स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती निमित्ताने दि. २८ मे २०२५ रोजी, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक आमदार तथा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांच्या निवासस्थानी सायंकाळी ०६:०० वाजता, स्वातंत्रविर सावरकरांचा जयंतीत्सव साजरी करण्यात आला.
याप्रसंगी सर्वप्रथम आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या कार्याची माहिती करून दिली. व स्वातंत्र्यविर सावरकरांपासुन प्रेरणा घेउन जिवनमान जगत देशाप्रती जागरूक रहावे. असे आवाहन केले. कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष संजय लाहे,अभियंता सेलचे कौस्तुभ डहाके, अमित संगेवार,सविता काळे,सविज जगताप अमित भागवत ,श्रेयस कदम, अमर रोडे,राजवर्धन डहाके,ऋषी भारती, स्वप्नील माजलगावकर, शंतनु चौधरी, श्याम नायसे, प्रतिक गावंडे, भावेश गाडगे, संदीप कुऱ्हे, व इतर उपस्थित होते.