वाशिम गेल्या पाच दहा वर्षापासून,सर्वांशी मिळून मिसळून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील, सर्वधर्मिय सर्वपक्षिय नागरिकांच्या सुखंदुःखात वेळोवेळी सहभागी होऊन सुनिल पाटील धाबेकर यांनी आपल्या मागे जनमताचा खूप मोठा जन महासागर तयार केला आहे.त्यामुळे संपूर्ण मतदार संघात केवळ आणि केवळ भावी आमदार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा ग्रामिण भागातील गावगाड्याच्या गप्पा वरून स्पष्ट दिसत आहे.या संदर्भात आमच्या साप्ता.करंजमहात्म्यच्या टिमने मानोरा आणि कारंजा तालुक्यातील,ग्रामिण भागाच्या प्रत्येक मंडलातील प्रत्येक खेड्यातील मतदाराचे,आगामी निवडणुकी संदर्भात भावी आमदाराबद्दलचे विचार किंवा मत जाणून घेतले असता, येथील जनता जनार्दनाचा कौल सुनिल पाटील धाबेकर यांनाच दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी कारंजा मतदार संघाचा बऱ्यापैकी विकास हा स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्याच काळात झाला होता.त्यांच्या मुळेच कारंजा येथे सुतगीरणी, महाविद्यालय,धनज येथील गॅस प्लॅन्ट सुरु करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यांनी कारंजा येथे महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाची औद्योगीक वसाहतीला शासनाकडून मंजूरात सुद्धा आणलेली होती. त्यांनी कारंजा तालुक्यातील कित्येक गोरगरीब मध्यम वर्गीय कुटुंबातील बेरोजगारांना कायम स्वरूपी रोजगार व नोकऱ्या सुद्धा मिळवून दिल्यात.त्यांनीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे कारंजेकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. शिवाय ग्रामिण भागात त्यांच्या मुळेच रस्त्याचे बांधकाम आणि डांबरीकरण होऊन आज प्रत्येक खेडे तालुक्याशी जोडल्या गेले. हा अलिकडचा इतिहास आहे. आज स्व.बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनिल धाबेकर यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची निवड त्यांची कर्मभूमी म्हणून केली आणि मतदार संघाच्या कायमस्वरुपी विकासाचे स्वप्न बाळगले आहे. त्यामुळे त्यांनी कारंजा येथेच आपले निवासस्थान करून जनसंपर्क व जनसंवाद वाढवीला आहे.त्यांच्याबद्दल येथे विशेष नमुद करावेसे वाटते ते म्हणजे, सुनिल पाटील धाबेकर हे सर्वधर्मिय हिंदु, मुस्लिम, गवळी, मराठा,कुणबी,बंजारा,भटक्या विमुक्त, ओबीसी,बहुजन बांधवांमध्ये मिळून मिसळून असणारे प्रामाणिक,कर्तव्यदक्ष,सेवाव्रती, धार्मिक आणि आध्यात्मिक विचारसरणीचे एकमेवाद्वितीय चारित्र्यवान नेते असून त्यांना प. पू. गुरुमाऊली यांचा आशिर्वाद आहे.त्यामुळे यापुढे केवळ आणि केवळ सुनिल पाटील धाबेकर हेच कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात निवडून येवू शकतात.आणि तेच जैनांची काशी आणि गुरुनगरी असलेल्या कारंजा शहराला आणि मानोरा शहराला तिर्थक्षेत्र घोषीत करून येथील तिर्थक्षेत्र विकास आरखड्यानुसार विकासाकरीता हवा तेवढा तिर्थक्षेत्र विकास निधी मिळवून येथे उच्च शिक्षणाच्या सोयी,छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करू शकतात.तसेच शासकीय अधिकार शाहीवर अंकुश ठेवून येथील विकास करू शकतात. त्यांच्या विजयाचा ग्रामिण भागातील शेतकरी, मजूर,कामगार, सुशिक्षीत बेरोजगार यांना चांगला लाभ होऊ शकतो.अशी रास्त अपेक्षा मतदार संघातील मतदार जनता जनार्दन बाळगून असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे.