समाजात बरीच माणसं आहेत की त्यांच्याजवळ कोणती ना कोणती कला ही असतेस मात्र त्या कलेचा फार लोकं कमी विस्तार करतात. महाराष्ट्राच्या भूमीत बरेच कलाकार आहेत कुणाला वादनाची कुणाला गायनाची कला आहे, पण आजही ते अपेक्षित आहेत ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील नकटु जैराम मैन्द(५८) यांच्या जवळ ढोलकी वादनाची कला आहे, आज पर्यंत त्यांनी भजन, दिंडी, पालखी सोहळा, रामधून हरिपाठ, भागवत, व जवळ पास दोनशेहून अधिक दंडारी कार्यक्रमात ढोलकी वाजून आपले नाव लौकिक केले, मात्र
शासनाच्या सांस्कृतिक कला मंडळाकडून अजूनही त्यांना मानधन न मिळाल्याने ते उपेक्षितच आहेत त्यांना त्वरित मानधन सुरु करावा अशी मागणी होत आहे.