भारतीय जनता पक्षाचे कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना करून अनंत चतुर्थी पर्यंत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम अथवा उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा कार्यालयात दि. 19 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता श्री.ची स्थापना करण्यात आली. तर दिनांक 28 सप्टेंबर रोजी ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.यावे त्यावेळी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"च्या जयघोषाने परिसर ढवळून निघाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. बाप्पांना निरोप देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी लोकप्रिय आमदार अतुलभाऊ देशकर आवर्जून उपस्थित होते. यावेळी अतुलभाऊ गुलालाच्या रंगात रंगून गेले होते. सुरेश भटांच्या काव्यपंक्तीप्रमाणे "रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा "
दि.19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कारयालयाने ठरवून दिलेले विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये नव मतदार नोंदणी, आरोग्य तपासणी, रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, नवमाता बेबी किट वाटप कार्यक्रम, विविध स्पर्धा कार्यक्रम, स्वच्छता अभियान, इत्यादी कार्य ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे आणि भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनी सहकार्याने हे कार्यक्रम यशस्वी झाले,अशी माहिती कार्यालय तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा.संजय लांबे यांनी दिली.