कारंजा (लाड) : कारंजा (लाड) येथील श्री भिला माता संस्थान कारंजाचे अध्यक्ष,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे ज्येष्ठ सल्लागार,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कारंजाचे संस्थापक सदस्य डी जी मोरे उर्फ देवमन गणूजी मोरे यांना मदत सामाजिक संस्था नागपूर या शासनमान्य संस्थेचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरिय राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर झालेला असून, दि २२ डिसेंबर २०२४ च्या मदत सामाजिक कार्यकर्ता महासंमेलनात त्यांना मिळणार आहे.उल्लेखानिय म्हणजे देवमन गणूजी मोरे हे अष्टपैलू कलावंत बालपणापासूनच लोककला आणि नाट्यकला जगले आहेत. त्यांना ६४ कला पैकी २२ कला अवगत असून एकांकिका, नाटक, कलापथक, लोकनाट्य,पोवाडा,धामतेरी, गंगासागर, दशावतार,कलगीतुरा, गोंधळ, जागर,भारूड,गवळण,वासुदेव, एकतारी,बारी,जस,ढोलभजन, बासरी,पखवाज, हार्मोनियम, नृत्य,नकला, बंजारा गीते, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य आदी प्रकारच्या बावीस कलांवर त्यांनी प्रभूत्व मिळवीले आहे. चार दिवस प्रेमाचे, ती वेळच तशी आली, भूक,एकच प्याला इत्यादी नाटकामधून त्यांनी अभिनय केला होता . कारंजा येथे झालेल्या ४२ व्या विदर्भ साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील त्यांची कामगीरी उल्लेखनिय होती. लोककलावंताच्या मानधनात वाढ व्हावी ह्यासाठी त्यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांच्या खांद्यांला खांदा लावून काम केले होते. त्यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्ल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून ज्ञानेश्वर कडोळे, प्रकाश गवळीकर,श्रीकृष्ण पराते, शिवमंगल आप्पा राऊत, नंदकिशोर कव्हळकर, मोहीत जोहरापूरकर,डॉ कुंदन श्यामसुंदर, पांडूरंग माने, इम्तियाज लुलानिया आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....