अकोला:- महानगर आणि ग्रामीण, उपमहा नगर यांना जोडून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ चा चौफेर विकास समतोल संवाद सोबत सर्वस्पर्शी सर्वांना सोबत घेऊन व्यक्तिगत समस्या तसेच सामाजिक समस्या बरोबर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर राहणारे 18 तास काम करणारा नेतृत्व म्हणून आमदार रणधीर सावरकर यांनी पश्चिम विदर्भात संघटना आणि जनतेशी एकरूप होऊन सरकारच्या योजना चा लाभ सर्वसामान्यांना मिळून दिला अशा शेतकरी चळवळी व शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ जुळणारे आमदार रणधीर सावरकर 25 ऑक्टोंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय आळशी संकुल येथून जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेऊन महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यासोबत नामांकन पत्र भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज भरला यावेळी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते
क्रीडा सांस्कृतिक भवन पोलीस निवास तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुलन सोबत पशुवैद्यकीय महाविद्यालय व वेगवेगळ्या तीर्थस्थळाचा विकास सोबत हदवार क्षेत्राचा विकास व सर्वसामान्य नागरिकांना आधार मिळवून देण्याचे काम अकोला जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक लाभ मिळवून देण्याच्य कामाच्या जोरावर मतदारांसमोर आमदार सावरकर जातोय, मोठ्या फरकाने विजयी होण्याची खात्री भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या कार्यकर्त्यांना आहे.
सकाळी दहा वाजता वाजता भाजप आणि महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
त्यांच्या नामांकनासाठी खासदार अनुप धोत्रे आमदार अमोल मिटकरी,आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे माजी आमदार व शिवसेना नेते गोपीकिशन बाजोरिया माजी आमदार , विप्लव बाजोरिया जिल्हाध्यक्ष किशोर पाटील विजय देशमुख कृष्णा अंधारे, श्रीरंग दादा पिंजरकर , अश्विन नवले योगेश अग्रवाल, जयंत मसने गीतांजली शेगोकार सुमनताई गावंडे, संतोष शिवरकर प्रभाकर मानकर शिवाजीराव देशमुख विजय सोळंके दादाराव पेठे, श्रावण इंगळे आदींच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालय पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. आमदार सावरकर यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन त्यांना पाठिंबा दिला आहे