कारंजा-( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने मानोरा तालुक्यातील खंबाळा,विळेगाव ,कारली येथील कामांना प्रधानमंत्री आदि ग्राम विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजना या केंद्रीय योजनेअंतर्गत सन 2021 22 व 2022 23 या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या ग्रामविकास आराखड्यांना निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग कडून शासन निर्णय क्रमांक आअग्रा 2023 /प्र. क्र.68/का 19 मंत्रालय मुंबई दिनांक 5 जुलै रोजी घेण्यात आला. प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाने वाशिम जिल्ह्यातील मंजूर केलेल्या ग्राम विकास आराखड्याकरिता पुढील प्रमाणे निधी उपलब्ध करून देणे शासन मान्यता मान्यता देत असल्याचे म्हटले आहे. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेल्या गावांची संख्या केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेल्या गावांची संख्या वाशीम जिल्ह्यात दहा 10 असून ग्रामविकास आराखड्याच्या अंमल बजावणीकरिता 199.50 लक्ष मंजूर झाला असून आता वितरित करण्यात येणारा निधी 87.72लक्ष रुपये आहे. मानोरा तालुक्यातील खंबाळा, विळेगाव, कार्ली या गावातील कामांना शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ग्रामविकास आराखड्यातील ग्रामविकास आराखड्यातील काम निहाय वितरित करण्यात येणाऱ्या निधीचे वितरण मानोरा तालुक्यात याप्रमाणे आहे. मानोरा तालुक्यातील खंबाळा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम भूमिगत गटार अंदाजे किंमत 10लक्ष रुपये, ड्रेन बांधकाम 10 लक्ष रूपये, विळेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड बांधकाम भूमिगत गटार 5 लक्ष आणि ड्रेन बांधकाम 15लक्ष रुपये, कारली येथे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम 13.50 लक्ष, मुत्रिघर संडास 6.50लक्ष रूपये, एकंदरीत याप्रमाणे वरील प्रत्येक गावात 20 लक्ष रुपये या प्रमाणे उपरोक्त तीन गावांना 60 लक्ष रूपये निधि उपलब्ध उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अनुसूचीत जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव संकल्पनेवर आधारित संकल्पनेवर आधारित एकात्मिक आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी प्रधानमंत्री आदी ग्राम विकास योजना सुरू करण्याचा निर्णय घेवून संदर्भ क्र.1 केन्द्र सरकार जनजातीय कार्य मंत्रालय चे अ. शा. पत्र क्र.17011/ 01/2020/SLA, दि.17 मार्च 2022 येथिल पत्रान्वये केन्द्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. योजनेच्या अंमबजावणीकरीता राज्य स्तरातील आस्थापणामध्ये स्पष्टता राहण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या सूचनांच्या आधारे मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय 2 आदिवासी विभाग शासन निर्णय क्रमांक - संकीर्ण 2022/प्र. क्र.92 /का.19 दी.13 /7/2022 अन्वये निर्गमित केला आहे.