कारंजा : समस्त तेली समाज बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने कारंजा येथे संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती महोत्सव व तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवास येथे रविवार 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित या सोहळ्याला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतील. माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रा.तैलिक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला माजी आमदार रामदास आंबटकर, आमदार सईताई डहाके, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल पाटणकर हे विशेष अतिथी म्हणुन तर नागपूरचे आमदार कृष्णाजी पंचम खोपडे, यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर,देवळी वर्धाचे आमदार राजेश बकाने,
तुमसरचे आमदार राजुभाऊ कारेमोरे,महा.प्रां.तै.महासभेचे वाशीम जिल्हाध्यक्ष
शिवदासजी सूर्य पाटिल,
विश्वमांगल्य विदर्भ प्रांत अध्यक्ष
सौ. मधुराताई वैभव लेंधे,अ.भा.तै. साहू संघटनेचे राष्ट्रीय संघटक सुभाष श्रीराम घाटे,मूर्तिजापूर येथील तेली समाज अध्यक्ष विनायकराव गुल्हाने,समस्त तेली समाज महिला संघटनेच्या अध्यक्षा
श्रीमति प्रमिलाताई जिरापुरे,
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
अनिलभाऊ खोरगडे,
नानासा गुल्हाने,अमरावती महानगर पालिकेचे सहा.आयुक्त नंदकिशोर तिखिले,
वाशीम येथील अस्थिरोग तज्ञ, डॉ. श्याम अशोक काटेकर,
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ गुल्हाने,कारंजाचे नायब तहसिलदार अनिल विठ्ठलराव वाडेकर,अंजनगांव नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष वैभव साहेबराव लेंधे,कारंजा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेता. नितिन गढवाले,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
गजाननराव वसंतराव जाधव,
संजय क्षीरसागर हे या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.दरम्यान सर्व तेली समाज बांधवांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कारंजा येथील समस्त तेली समाज बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष किरण क्षार,उपाध्यक्ष अतुल गुल्हाने, उपाध्यक्ष अतुल ढोरे,सचिव सुनिल दहापुते,सहसचिव
संदीप गढवाले,कोषाध्यक्ष
विनय गुल्हाने,सदस्य
प्रविण राठोड,गजानन झंझाट,अनिल सुड़के सदस्य
प्रशांत बिजवे,बाबुराव ना.सरोदे,किशोर पाठे
सतीश क्षीरसागर
दिपक गोदे,गणेश गुल्हाने व सोहळ्याचे अन्नदाते प्रवीण राठोड यांनी केले असल्याचे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....