कारंजा (लाड) : मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या न्याय हक्काचे सरसकट आरक्षण आपल्याला मिळवून देण्याकरीता संघर्ष करणारे मराठा समाजाचे क्रांतीकारी नेते मनोज पाटील जरांगे यांची मंगळवार दि. 05 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 03:00 वाजता वाशिम जिल्ह्यातील ग्राम काटा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय मैदान व येथील 100 एक्कर शेत शिवारात,पश्चिम विदर्भातील ऐतिहासिक सभा होणार असून सदर सभेला सकल मराठा समाजाचे बांधव स्वयंस्फूर्तीने लाखोच्या संख्येत सहभागी होणार आहेत.तरी आपल्या कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवानी हजारो बांधवांच्या जास्तित संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजाची एकजूट दाखवावी.असे आवाहन कारंजाचे अखिल भारतिय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यात व कारंजा तालुक्यात आरक्षणासाठी आजतागायत सकल मराठा समाजाने प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला असून अतिशय शांती, संयम,शिस्त ठेवून आंदोलन पार पाडली आहेत. त्यामुळे यापुढेही "प्रत्येक कारंजेकर मराठ्यांनी आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी व्हावे." तसेच "वाशिम जिल्हयातील ग्राम काटा येथे होणारी सभा माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आपले हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी आहे हे लक्षात घेऊन सभेसाठी शांती व संयम ठेवून हजेरी लावून सहकार्य करावे." असे आवाहन अखिल भारतिय मराठा महासंघ वाशिम जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांनी केले आहे .