कारंजा (लाड) : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यतत्पर कार्यसम्राट खासदार मा.संजयभाऊ देशमुख यांनी दिल्लीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील दीर्घकालीन प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा केली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असून, वाशिम व यवतमाळकरांसाठी ही एक ऐतिहासिक बातमी आहे!
कर्तव्यतत्पर खासदार संजयभाऊ देशमुख यांची सातत्याने "मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा -- यवतमाळ" या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठीची मागणी होती. या मार्गाचे DPR देखील बनवायचे काम त्यांनी पाठपुरावा करून सुरू करून घेतले. या सुरू असलेल्या DPR (Detailed Project Report) बद्दल यावेळेस चर्चा केली. हा DPR अंतिम टप्प्यात आला असून, पूर्ण होताच तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या "मुर्तिजापूर -कारंजा-दारव्हा-यवतमाळ" मार्गावर एकेकाळी चालणारी ‘शकुंतला एक्सप्रेस’ पुन्हा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.तसेच नांदेड व्हाया वाशिम–मुंबई रेल्वे लवकरच सुरू होणार ! ट्रेन क्र. 17665/66 आणि 17667/68 (नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस) ही रेल्वे वाशिम मार्गे मुंबईसाठी मंजूर असूनही अद्याप सुरू झालेली नाही. कर्तव्यतत्पर कार्यसम्राट खासदार संजयभाऊ देशमुख यांनी ही ट्रेन तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती काल झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमारजी यांनी ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला प्रथमच मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे मिळणार आहे, वाशिम जिल्ह्यातील जनतेचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.तसेच यावेळी खासदार संजयभाऊ देशमुख यांनी वर्धा–नांदेड या रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची गंभीर बाब चेअरमन यांच्या निदर्शनास आणून दिली. हा लोहमार्ग यवतमाळ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या कामास गती देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. रेल्वे बोर्डाने या मार्गाचे सघन निरीक्षण करून काम वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. या संदर्भात कर्तव्यतत्पर तथा खासदार संजय भाऊ देशमुख यांचे मनोगत जाणून घेतले असता त्यांनी सांगीतले की,"वाशिम जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सुविधा ही गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे. ती आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. मी वाशिमवरून मुंबईसाठी ट्रेन आणणार म्हणजे आणणार आहे. तसेच वर्धा-नांदेड हा रेल्वे मार्ग जलद गतीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत असून याला वेळेत पूर्णत्वास घेऊन जाणार आहे. तसेच "मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा - यवतमाळ" या ब्रॉडगेज प्रकल्पाला मंजुरी मिळेपर्यंत मी सातत्याने पाठपुरावा करणारच.
हे तिन्ही प्रश्न माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत, आणि हे काम पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही."