तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी : - चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली त्यात ब्रह्मपुरी जिल्हा घोषित झाल्याची प्रसारमाध्यमावर बातमी धडकली मात्र रात्री ब्रह्मपुरी चे नाव वगळून गडचिरोली जिल्हा घोषित करण्यात आला हा ब्रह्मपुरी कराच फार मोठा अन्याय होता. ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी 1982 पासून ब्रह्मपुरीकरांनी अनेक आंदोलने केली मागील एका वर्षात ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको, धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन व मोर्चे काढून शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले मात्र सरकारने ब्रह्मपुरीकरांच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले पुन्हा एकदा ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने मुंबई येथील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून जिल्हा निर्माण करण्याच्या मागणी करिता भर धो धो पावसात छत्र्या घेऊन आझाद मैदानावर दिनांक 28 जून 2024 रोजी एकदिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले .
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे संयोजक कॉ.विनोद झोडगे व प्रशांत डांगे यांनी केले .आंदोलनात समितीचे नेते विनोद झोडगे यांनी प्रास्ताविक करून ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी कशी रास्त आहे आणि ते भविष्यात येणाऱ्या पिढीला किती महत्त्वाचा आहे हे पटवून देऊन जोपर्यंत जिल्हा बनणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही अशी भूमिका मांडली तर निमंत्रक प्रशांत डांगे यांनी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे जिल्हा करिता जे आंदोलन झाली त्याची पार्श्वभूमी आणि ब्रम्हपुरी जिल्हा ईतर तालुक्यांना कसे सोईचे होईल ते सांगितले .
या धरणे आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई कोहपरे,वनिताताई कुंठावार,जयघोष दिघोरे,रामदास चौधरी,श्रीधर वाढई,गणेश चापले,योगाजी टेंबुरणे तसेच तालुक्यातील शेकडो जिल्हा प्रेमी उपस्थित होते.धरणे आंदोलनानंतर समितीच्या वतीने शिष्ट मंडळाद्वारे मान.मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले नामदार शंभूराजे देसाई मंत्री यांनी निवेदन स्वीकारून ब्रम्हपुरी जील्ह्या सबंधी सकारात्मक चर्चा केली .
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित कराल हि विनंती.