वाशिम : तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे अव्वल सचिव अमोलजी पाटणकर यांच्या अथक परिश्रमातून जिल्ह्यातील मानोरा तालूक्यातील श्रीश्रेत्र कोंडोली येथील पितांबर महाराज संस्थानला यावर्षी तिन कोटी रुपयाचा निधी तिर्थक्षेत्र विकास निधी मंजूर करण्यात आला असून,मंगरूळनाथ तालुक्यातील श्रीक्षेत्र तऱ्हाळा येथील श्री शंभूशेष महाराज संस्थान तऱ्हाळा येथील विकास कामांसाठी पाच कोटी रुपये निधी,मंगरुळनाथ तालुक्यातील तिर्थक्षेत्र गिंभा येथील श्री जगदंबादेवी संस्थान विकासाकरीता पाच कोटी रुपये निधी तर मंगरूळनाथ तालुक्यातीलच श्री संत झोलेबाबा संस्थान चिखली येथील विकासाकरीता तिन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.यापूर्वी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे अव्वल सचिव जिल्ह्याचे सुपूत्र अमोलजी पाटणकर यांच्या प्रयत्नातून उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी राज्याच्या पर्यटन विकास कार्यक्रमातून श्रीक्षेत्र कोंडोली १.५ कोटी एवढा निधी मंजूर केला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना श्री क्षेत्र कोंडोली हे तिर्थक्षेत्र तथा पर्यटन क्षेत्र म्हणुन विकसीत करायचे आहे. त्यासाठी त्यांनी दिलेला भरधोस निधी व आशिर्वाद कोडोंलीकर तथा समस्त वाशिम जिल्हा वासीय कधीच विसरणार नाही. अशा शब्दात जिल्हयातील नागरीकाच्या प्रतिक्रिया येत असून गेल्या काही वर्षात जिल्ह्याच्या तसेच कारंजा मानोरा मतदार संघाच्या विकासाकरीता जिल्ह्याचे सुपूत्र अमोलजी पाटणकर यांचा मोलाचा हातभार लागत असल्याचे जिल्ह्यातील नागरीक आपल्या भावना व्यक्त करीत असतांना सांगत आहेत.
वाशिम जिल्ह्यात आदरनिय देवेंद्र फडणवीस यांनी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून
१. पितांबर महाराज संस्थान, कोंडोली, ता- मानोरा- ₹ ३ कोटी
२. शंभू शेष महाराज संस्थान तऱ््हाळा, ता- मंगरूळनाथ- ₹ ५ कोटी
३. जगदंबा देवी संस्थान, गिंभा, ता- मंगरूळनाथ- ₹ ५ कोटी
४. संत झोलेबाबा संस्थान चिखली, ता- मंगरूळनाथ-₹ ३ कोटी