चंद्रपूर जिल्हा हा विद्युत उत्पादक जिल्हा आहे .गेल्या सात वर्षानंतर महाराष्ट्र राज्यात भारनियमन सुरू झालेले आहे ब्रह्मपुरी तालुक्यात दिनांक ६/ ४/२०२२ पासून अनिश्चित वेळेसाठी भारनियमन सुरू झालेलेआहे .भारनियमनाच्या वेळा देखील अशा असतात की, सायंकाळी सहा वाजेपासून अनिश्चित वेळासाठी,पहाटे चार वाजेपासून अनिश्चित वेळेसाठी, दुपारी २ वाजे पासून अनिश्चित वेळेसाठी भारनियमन असते .तालुक्यातील जनता अगदी परेशान झाली आहे.दिवसभर काबाडकष्ट करून आलेले ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर, कामगार,स्त्री आणि पुरुषांना सायंकाळी सहा वाजेपासून भारनियमनाचा सामना करावा लागतो आहे .
१)आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असतांना जनतेला निद्रानाशाच्या प्रादुर्भावाला बळी पडावे लागत आहे.
२)भारनियमनामुळे विद्युत अभावी मच्छरांचा सुळसुळाट वाढलेला आहे.यामुळे अनेक संसर्गजन्य रोग प्रसारीत होण्याची शक्यता आहे.
३)ब्रह्मपुरी तालुका हा व्याघ्र प्राबल्य तालुका आहे .तालुक्यातील अनेक लोकांचा बळी गेलेला आहे भारनियमनामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
४)भारनियमनामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील उन्हाळी भात पीक तसेच फळ भाजी आणि पालेभाजी पिकांची पूर्णपणे हानी होत आहे
५)ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळेस भारनियमन होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अशक्यप्राय झालेले आहे.
६)हा काळ धार्मिक सणांचा, देवदेवतांच्या उत्सवांचा काळ आहे. तसेच गावागावात भागवता सारखे मंगल कार्यक्रम होत आहेत तसेच विवाह सोहळे व सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा काळ असून जनतेच्या आनंदावर विरजण पडत आहे .
७) तालुक्यातील छोटे-मोठे गृह उद्योग कुटिर उद्योग तसेच मोठ्या उद्योगांना फटका बसलेला आहे
८) तालुक्यातील स्तनदा व गरोदर माता,शिशू व लहान मुले यांच्या आरोग्यावर भारनियमनामुळे विपरित परिणाम होत आहे
यासारख्या अनेक समस्या ज्या शब्दात व्यक्त करता येणार नाही.एकूणच भारनियमनामुळ अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. सामाजिक,सांस्कृतिक ,धार्मिक, आर्थिक,मानसिक, आरोग्यविषयक इत्यादी समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि जनतेला या समस्यांना सामोरे जावे लागत आहे .त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील भारनियमन ताबडतोब बंद करण्यात यावे. जनतेच्या भावनेशी खेळणे बंद करावे.जनतेच्या भावनेचा उद्रेक झाल्यास आंदोलन करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही जबाबदारी असेल. असे भारतीय जनता पार्टी तर्फे रामलाल महादेव दोनाडकर तालुकाध्यक्ष,भाजयुमो तथा माजी सभापती पं. स. ब्रह्मपुरी,संजय वामनराव भोयर ग्रा.पं.सदस्य गांगलवाडी, अनिलजी तिजारे सरपंच ग्रा.पं. तळोधी उमेश घुले सरपंच मुई देवरावजी नन्नावरे उपसरपंच मूई राजेश्वरजी मगरे अध्यक्ष आदिवासी आघाडी भाजपा ब्रह्मपुरी यांनी निवेदन दिले
आपल्या प्रतिक्रिया द्या....