कारंजा : गेल्या चार महिन्यांपासून निराधारांना अनुदान नसल्यामुळे निव्वळ अनुदानावर अवलंबून असणाऱ्या विधवा महिला,दुर्धर आजार ग्रस्त दिव्यांग व्यक्ती आणि वयोवृद्ध नागरीक चातका प्रमाणे अनुदानाची प्रतिक्षा करीत होते. तर तिकडे तहसिल कार्यालयातील तहसिलदार कुणाल झाल्टे,नायब तहसिलदार विनोद हरणे संगायो विभागाच्या कर्मचार्याकडून मागणी पत्र बनवून वेळोवेळी वरिष्ठाकडे संबधीत विभागांना पाठवून संगोयोच्या अनुदाना करीता पाठपुरावा करीत होते. परंतु अनुदान प्राप्त होतच नसल्याने निराधारावर उपासमारीची वेळ आलेली होती. शासनाची संगायो अनुदान योजना सुरु झाली तेव्हा पासून कारंजा तहसिल कार्यालयाच्या संगायो विभागाचा कारभार संपूर्ण अमरावती विभागात अव्वल दर्जाचा राहीलेला असून,कारंजा तहसिलचे तहसिलदार व कर्मचारी प्राधान्याने निराधाराकडे लक्ष्य देत असल्याने येथील निराधारांना दरमहा वेळेवर अनुदान मिळत असते.मात्र गेल्या चार महिन्यापासून प्रत्यक्ष शासनाकडूनच अनुदान प्राप्त न झाल्याने तहसिल कार्यालय सुद्धा हतबल झाले होते.मात्र अखेर दिवाळी पूर्वी टप्प्याटप्याने गेल्या चार महिन्याचे अनुदान प्राप्त झाल्याने कारंजा तहसिल कार्यालयाच्या कर्मचार्यानी स्वतःची घराकडे व कुटुंबियाकडे अक्षरश: दुर्लक्ष्य करून "आधी दिवाळी निराधाराची नंतर आम्हा कर्मचाऱ्याची" हा निर्धार करून निराधारांच्या खात्यात टप्प्या टप्प्याने माहे जुलै,ऑगष्ट, सप्टेंबर,ऑक्टोंबर अशा चार महिन्याचे अनुदान वळते करून, विधवा महिला,दुर्धर आजारग्रस्त, निराधारांच्या चेहर्यावर हास्य फुलवीले व त्यांची दिवाळी गोड केली ह्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी तहसिलदार कुणाल झाल्टे, नायब तहसिलदार विनोद हरणे, संगायो विभागातील कर्तव्यतत्पर कर्मचारी श्रीकांत मेहंगे, संजीवनी वानखडे मॅडम, शुद्धोधन कवळे यांचे अभिनंदन केले आहे.