वरोऱ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदोरी टोल प्लाझा जवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले ही घटना 23 एप्रिल रोजी दुपारी सव्वादोन च्या सुमारास घडली
ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 38 40 हा वरोरा वरून नव्याने बांधण्यात आलेला वणि बायपास या मार्गाने जाण्यासाठी वळला असता नागपूर कडे जाणारी डी एन आर ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 34 बी एच 75 77 नव्याने बांधण्यात आलेल्या उडान पुलावरून न जाता पुलाखालील रस्त्यावरून ट्रॅव्हलच्या ड्रायव्हरने गाडी टाकल्याने वळणावर हा अपघात घडला या अपघातात प्रतिक रवींद्र आलम,कंडक्टर, शुभम रमेश उत्तलवार ,ड्रायव्हर,चंद्रपूर अनुप प्रभाकर ठाकरे रा.खैरी हा प्रवासी जखमी झाला या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले सदर डी.एन.आर ट्रॅव्हल्स वर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाअसून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे