कारंजा : कारंजा शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या, संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था, कारंजा यांच्या सामाजिक कार्याची, राज्य पातळीवर दखल घेण्यात येऊन,महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघाच्या वतिने त्यांना केद्रिंय मंत्री ना नितीनजी गडकरी यांचे हस्ते उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. या बाबत सविस्तर वृत्त कळवितांना संस्थेचे सल्लागार तथा प्रसिद्धी प्रमुख संजय कडोळे यांनी कळविले की, महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघ यांनी समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाच्या समान बांधव, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि गुणवंत विधार्थी यांचा नगपूर येथे सत्कर सोहळा आयोजित केलेला होता. या सोहळ्यात संत गाडगे बाबा विचार मंच बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे यांच्या लोकोपयोगी उपक्रमाची विशेष दखल घेण्यात येऊन त्यांनी कोव्हिड 19 कोरोना वैश्विक महामारित केलेल्या, अन्न पाकीट वितरण, रक्तदान, वृक्षारोपन, मोफत शववाहिका इत्यादी कार्याची विशेष वाहवा करण्यात येऊन, त्यांना [केंद्रीय मंत्री, भारत सरकार] नितीनजी गडकरी, धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवरावजी सोनटक्के तथा आ चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते, उत्कृष्ट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . याप्रसंगी अध्यक्ष संतोष धोंगडे, उपाध्यक्ष राजेश चंदन, भारत धोंगडे यांनी, ना नितीन गडकरी यांचेकडे, संत गाडगेबाबा विचार मंच बहु संस्थेकडून निवेदन देऊन, संस्थेच्या लोकोपयोगी समाज कार्याचा आढावा देत संस्थेकरीता अत्याधुनिक रुग्नवाहिकेची गरज असल्याचे पटवून देत रुग्नवाहिकेची मागणी केली त्यावर ना . नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशीमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले . सदरहु कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे पार पडला .