आंतरराष्ट्रीय शिवपुराणकार व भक्ती ज्योत प्रज्वलित करणारे सिहोर वाले बाबा प्रदीप जी मिश्रा यांची पाच मे ते अकरा मे पर्यंत या आपल्या मतदारसंघात शिव कथा पुराण येत होत असून यानिमित्ताने अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती बुलढाणा वाशिम आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड घरातील इतर भागातून भाविक भक्त येत असून राजराजेश्वर नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असून भक्तांना कोणतेही त्रास होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन नॅशनल हायवे जिल्हा परिषद पोलीस प्रशासन मनपा प्रशासन पाणीपुरवठा वीज वितरण कंपनी एसटीमहामंडळयांनी दखल घ्यावी दक्षता घ्यावी तसेच यामध्ये कार सेवा करणारे मातृशक्ती युवाशक्ती व विविध सामाजिक संघटनेने सेवेसाठी पुढाकार घेतला आहे व भक्तांना विविध सोयी उपलब्ध करून देऊन आले त्यांचे अभिनंदन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.
शिवपुराण मध्ये कोणतीही अनिष्ट घटना होऊ नये यासाठी आयोजकांनी दक्षता घ्यावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासनाने जनतेला अडचण होणार नाही वाहतुकी मुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वाहतूक विभागाने लक्ष केंद्रित करावे तसेच नॅशनल हायवे तसेच एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात यावी तसेच मनपाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशाही सूचना आमदार सावरकर यांनी दिली आहे आपले ज्येष्ठ सहकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या सोबत त्यांनी अनेक विभागाशी संपर्क साधून शिवमहापुराण मध्ये येणाऱ्या भक्तांना गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती दाखल घ्यावी या शिवमहापुराणाने जिल्ह्यात व महानगरात यात्रेची स्वरूप निर्माण झाले आहे त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. ही सूचना आमदार सावरकर आमदार शर्मा यांनी दिली आहे तसेच अकोला शहर अध्यात्म सामाजिक व मानवता कार्यासाठी प्रसिद्ध असून शहरातील विविध संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते भक्तांच्या सोयीसाठी पुढे आले आहेत त्यांची सुद्धा अभिनंदन आमदार सावरकर यांनी केले आहे.
अकोला शहरामध्ये अडीअडचणी येणार नाही व भक्तांना तिथे अडचण येणार नाही यासाठी सुद्धा आयोजकांनी योग्य तो नियोजन करावा प्रशासन त्यांना सहकार्य करीत असाही विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला आहे