आरमोरी:-
महात्मा ज्योतीबा फुले युवा संघर्ष समीती यांच्या तर्फे ११ ते १४ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे.
मागील २३ वर्षापासुन या समिती द्वारे महामानवांची जयंती अगदी जल्लोशात आणि त्यांचे विचार समोर ठेऊन साजरी केली जाते. त्याचेच औचित्य साधुन यावर्षी सुद्धा ११एप्रिल २०२२ सोमवार ला सकाळी ठीक ७.३० वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे सायंकाळी ठिक ७ वाजता शाहिर. भगवानजी गावंडे अकोट (अकोला) यांचे "युद्ध नको बुद्ध हवा " इतिहास क्रांतिचा या वर भव्य प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे १२ एप्रिल व १३ एप्रिल ला सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि १४ एप्रिल सकाळी ठीक ७.३० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणुक आरमोरी येथील मुख्य मार्गाने निघणार आहे.
शाहिर. भगवानजी गावंडे अकोट (अकोला) यांचे युद्ध नको बुद्ध हवा " इतिहास क्रांतिचा या प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून मानवी समाजाला आता युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे या विचारांची लस देवुन आपला मानवी समाज अधिक बळकट करण्याचे काम या समाज प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातुन होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सचिनभाऊ खोब्रागडे प्राचार्य श्री. किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड. , सहउद्घाटक मा. पवन नारनवरे नगराध्यक्ष नगर परिषद आरमोरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जयकुमार मेश्राम सामाजिक कार्यकर्ते तसेच उपाध्यक्ष मा. मनोज काळबांडे साहेब पोलीस निरीक्षक पो.स्टे. आरमोरी.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालिनीताई गेडाम (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) , कालिरामजी गायकवाड (सामाजिक कार्यकर्ता ,आरमोरी ) , विनोद शेंडे सर( प्राचार्य , डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय , आरमोरी ) , योगेंद्र बन्सोड सर ( सामाजिक कार्यकर्ता , आरमोरी ) , डॉ .चिखराम साहेब ( आरमोरी ), मिलिंद खोब्रागडे ( नगरसेवक आरमोरी ), भारतभाऊ बावणथडे ( नगरसेवक आरमोरी ), प्रशांत सोमकुंवर ( नगरसेवक आरमोरी ) , अमोल मारकवार ( माजी जि .प सदस्य ) , मनीष राऊत सर ( सामाजिक विचारवंत आरमोरी ) , मा. हितेश कमलाकर रामटेके वैज्ञानिक कें. भुमीजल बोर्ड जोधपुर राजस्थान जलसंसाधन मंत्रालय भारत सरकार , प्रफुल खापरे (सामाजिक कार्यकर्ते ), मनोज ठकरानी महाराष्ट्र साडी सेल आरमोरी , रामहरी वाटगुरे (सामाजिक कार्यकर्ते) , कल्पनाताई तिजारे (सामाजिक कार्यकर्त्या ). कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती आयु. ताराचंद जी नागदेवे सर सामाजिक कार्यकर्ते आरमोरी .
तरी वरील सर्व कार्यक्रमास जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक महात्मा ज्योतीबा फुले युवा संघर्ष समीती यांनी केलं आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....