कारंजा (लाड) : स्थानिक कारंजा (लाड) येथील, 'प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजा' या संस्थेने,आपल्या प्रामाणिक व निःस्वार्थी संचालक पदाधिकाऱ्यांच्या आणि प्रमुख म्हणजे दररोज जिद्द व चिकाटीने १४ ते १५-१५ तास काम करून, संस्थेला प्रगतीच्या उंच शिखरावर पोहचवीणाऱ्या,कार्यतत्पर महिला व्यवस्थापिका सौ.आशाताई कृष्णराव राऊत यांच्या अथक प्रयत्नामुळे, 'शुन्यातून विश्व निर्माण' केले आहे. त्या बद्दल संस्थेचे वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी कौतुक होऊन,बँकींग क्षेत्रातील 'बँको पुरस्कार' मिळाले असून संस्थेला ऑडीट 'अ' दर्जा ही मिळालेला आहे. शिवाय दि.१४ एप्रिल २०२५ रोजी 'महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांचे भव्य व दिव्य असे आकाशातून दिसणारे तांदूळा पासूनचे 'भिमशिल्प' चित्रकार मनोज पातुरकर यांच्या द्वारे साकारून महामानवाला अभिवादन करून वंदना केली आहे.त्याबद्दल प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेची दखल जागतीक पातळीवर घेतल्या जावून,प्रशिक पतसंस्थेचा विश्वविक्रम आणि नावलौकीक जगभरात झाला आहे.त्यासाठी जगभरातून पतसंस्थेचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे. शिवाय वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. संजयभाऊ देशमुख आणि कारंजाच्या पहिल्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांनी प्राशिक ग्रामीणपतसंस्थेचा पारदर्शी कारभार आणि शेतकरी व ग्राहकांकरीता बँकेकडून देण्यात येणाऱ्या विविध सोई सुविधा,योजना,मागेल त्याला तात्काळ कर्जपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेच्या संचालक मंडळ आणि व्यस्थापिका सौ.आशाताई राऊत यांचे खुल्या दिलाने कौतुक करून,संचालकांना सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले होते.विद्यमान संचालक मंडळ आणि विकास पॅनलच्या सभासदांच्या प्रयत्नातून,संस्थेने कारंजा शहरातील जवळ जवळ सर्वच सहकारी पतसंस्थाना व काही बँकांना मागे टाकून या पतसंस्थेने संपूर्ण तालुक्यात आपले कार्यक्षेत्र व्यापक प्रमाणात वाढवले आहे.शिवाय संचालक व व्यवस्थापिका सौ. आशाताई कृष्णराव राऊत यांचा पारदर्शी कारभार आणि त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे, पतसंस्थेच्या ह्या छोट्याशा रोपट्याची वाढ होऊन त्याचे रुपांतर महाकाय अशा बोधीवृक्षामध्ये झाले आहे. म्हणजेच पतसंस्थेने एका छोट्याशा संस्थेच्या भागभांडवलदार सभासदांशी हितगुज वाढवून संख्या वाढवून, त्यांचेसोबतच्या यशस्वी व्यवहारातून जमा ठेवी वाढवून घेतल्या,त्या व्यवहारामधून भाग भांडवलदारांचा आणि प्रत्येक ग्राहकांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा आर्थिक विकास करण्यावर भर दिलेला आहे.संकटात व अडीअडचणीत असणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना त्यांनी पतसंस्थेकडून कर्जपुरवठा व विमा संरक्षण देवून त्यांचा विकास साधला आहे.त्यांच्या यथायोग्य कार्यपद्धतीने कित्येक शेतकरी ग्रामस्थांची अडली-नडली कामे मार्गी लागून संस्थेने ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे.आज रोजी संस्थेमुळे अनेक बेरोजगार महिला व पुरुषांना स्वतःचा लघुव्यवसाय करण्याची,स्वयंरोजगार करण्याची व त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची म्हणजेच रोजीरोटीची सोय सुद्धा झाली आहे.त्यामुळे सध्या लागलेल्या प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या पार्श्वभूमिवर त्यांच्या ग्राहकांमध्ये आणि कारंजा शहरामध्ये सकारात्मक चर्चा असून, 'कार्यतत्पर व यशस्वी कर्तबगार' नेतृत्वानेच संस्थेचा विकास साध्य करावा लागतो. विकासासाठी एखाद्यावेळी,वेळ प्रसंगी कठोरपणानेही वागावे लागते.परंतु सदैव सहकार्याची भूमिका वठविणारे पदाधिकारी, व्यवस्थापक हे ग्राहकांच्या हृदयात प्रेमाचे स्थान करून राहतात.हेही तेवढचं खरं असते. त्यामुळे आज प्रशिक पतसंस्थेच्या निवडणूकीच्या पर्वावर संपूर्ण कारंजा शहरातील प्रशिकचे सभासद,ग्राहक,मतदारांकडून, पतसंस्थेच्या संचालकावर व विकास पॅनलवर १००% विश्वास असून,पतसंस्थेला विकासाकडे नेणाऱ्या विकास पॅनलच्या सभासदांचीच निवड व्हायला हवी.विरोधकांनी कितीही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला.मतदारांना भडकवीले तरी सुद्धा अशा दुटप्पी व चुकीच्या अपप्रचाराला बळी पडायचे नाही. त्यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या फसवणूकीमध्ये यायचे नाही असा पवित्रा संस्थेचे भागभांडवलदार,ग्राहक संमजसपणाने घेतांना दिसत आहेत.या निवडणुकी संदर्भात आम्ही काही ग्राहक मतदारांचे मत जाणून घेतले असता त्यांनी तर स्पष्टच सांगितले की, "प्रशिक पतसंस्था आम्हाला संकटकाळी किंवा अडल्या नडल्यावर मागीतले त्यावेळी कर्ज देते.दिलेल्या कर्जावर कोणतीही बँक व्याज आकारते.किंवा वसुलीचा तगादाही लावते तर त्यात गैर (चुकीचे) काय ? परंतु या पतसंस्थेमुळे आमचा व आमच्या कुटुंबाचा विकास होत आहे.हे निर्विवाद सत्य आणि संस्थेचे उपकार आम्ही विसरू शकत नाही.त्यामुळे विकासासाठी आमचे मतदान आम्ही विकास पॅनललाच करणार." असे त्यांनी ठासून सांगीतले.त्यामुळे सद्यस्थितीत पतसंस्थेचे संचालक आणि विकास पॅनलचे उमेद्वार यांच्या विषयी संपूर्ण कारंजा शहर व तालुक्यातील सभासद, भागभांडवलदार,ग्राहक हे जागरूक असून,सुशिक्षित व सुज्ञ असल्याचे स्पष्ट होत असल्याने ते सर्वोतोपरी विचार विनिमय करूनच केवळ आणि केवळ 'विकास पॅनललाच' मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी, लोकशाही मार्गाने,प्रत्यक्ष मतदान होणार असून निवडणुकीमध्ये, विकासाच्या दृष्टीने सक्षम व विश्वासू असणारे उमेद्वार मैदानात आहेत.अनुसूचित जाती प्रवर्गातून ॲड. रवी काशीनाथ रामटेके, महिला राखीव सभासदासाठी सौ.सुनिता दिपक उके, तर दुसऱ्या महिला सभासदासाठी अनघा आनंद उकर्डे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रशांत नारायण काळे, वियुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्गा मधून मेघन मधुकर जुमळे, जमाती प्रवर्गातून कृष्णा विठ्ठलराव राऊत,पांडूरंग मोतिराम भगत ; व आकाश भाष्कर कऱ्हे, तर सर्वसाधारण प्रवर्गातून आशिष माणिकलाल बंड, गुलाबराव चंपतराव साटोटे आणि ओंकार श्रीराम पाढेण असे विश्वासू व सुस्वभावी उमेद्वार मैदानात असून कारंजेकर जनता जनार्दनामध्ये मिळून मिसळून सहकार्याने वागणारे आहेत.त्यामुळे लवकरच होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय सुनिश्चित मानला जात आहे.