पूरग्रस्तांना व अतिवृष्टीग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री दिलीप घोडाम जिल्हा सचिव,आदीवासी कॉंग्रेस,जिल्हा गडचिरोली,तथा अध्यक्ष कामगार संघटना व शेतकऱ्यांनी दिला तहसीलदार आरमोरी यांना निवेदन
आरमोरी:-
आरमोरी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व विविध नदी नाल्याला आलेल्या महापुरामुळे शेतपिक पाण्याखाली गेल्याने जोगीसाखरा, पळसगांव, रामपुर, कासवी, आष्टा, अंतरजी, मोहझरी, शिवनी, भाकरोंडी व इतर गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत देण्याची घोषणा करीत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुध्दा केली. शासनाच्या आदेशानुसार संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले, मात्र ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही. अशा शेतकऱ्यांचे नावे नुकसान भरपाई यादीत समाविष्ठ करण्यात आली आहेत. यामुळे खरा नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासुन वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यामध्ये सर्वे करणा-या संबंधित विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्या प्रती रोष व्यक्त केल्या जात आहे. करीता वरिष्ठ स्तरावरून सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारना करून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यात यावा या करिता अदिवासी कांग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम व तालुक्यातील शेतकरी याच्या उपस्थितीत तहसील कार्यालय आरमोरी येथे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना नायब तहसिलदार दोनाडकर यांच्या सोबत चर्चा करताना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की,साहेब यादीत घोळ आहे की घोळात यादी कारण असे शेतकरी पूरग्रस्त दाखविले की जर त्यांची शेती पाण्याखाली गेली तर किती गावे पूरग्रस्त होतील व एकाच सातबाऱ्यावर 1 हेक्टर जमिनीवर तीन भावांचे नावे असतील तर प्रति भावांना किती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अश्या प्रकारचे प्रश्न विचारले व नायब तहसिलदार यांच्या असेही निदर्शनास आणून दिले की तिन्ही भावांच्या नावाने 1 हेक्टर नुकसान भरपाई जमा झालेली आहे म्हणजेच 1 हेक्टर नुकसान व भरपाई 3 हेक्टर मिळालेली आहे यावर त्यांनी सभा आयोजित करून आपल्या विषयांचा उलगडा करून न्याय देण्यात येईल असे सांगितले.