कारंजा लाड: ब्रम्हाकुमारीज मार्फत आयोजीत रक्तदान महा अभीयानात रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे. असे आवाहन अमरावती केंद्राच्या प्रमुख राजयोगीनी ब्र. कु. सिता दिदी व संयोजक डॉ उल्हास भाई यांनी केले आहे.ब्रम्हाकुमारीज विश्व परीवर्तन केंद्र बडनेरा रोड येथे दि २३ ऑगष्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यन्त शिबीराचे आयोजन केले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,ब्रम्हाकुमारीज मुख्य केंद्राच्या माजी प्रशासीका राजयोगीनी प्रकाशमणी दादीजी यांचे अठराव्या पुण्यस्मरणानिमीत्त व विश्व बंधूत्व दिनाचे औचित्याने नेपाळसह संपूर्ण देशभरात
ब्रम्हाकुमारीज केंद्रावर रक्तदान महा अभीयान राबवित आहे . या अभियानात एकलाख युनीट रक्तदानाचा संकल्प आहे . त्यानुसार अमरावती येथील बडनेरा रोड स्थीत विश्व परीवर्तन केंद्रावर अमरावती पंजाबराव देशमुख शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने दि.२३ऑगष्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तेव्हा रक्तदात्यांनी मोठया प्रमाणात समोर येवून आपले रक्तदान करावे असे आवाहन ब्रम्हाकुमारीज केंद्र अमरावतीच्या प्रमुख संचालिका राजयोगीनी ब्र.कु.सिता दिदी; संयोजक डॉ उल्हास भाई यांनी केले असल्याचे वृत्त ब्रम्हाकुमारीचे परिवाराचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. अशोकराव उपाध्ये यांनी कळवीले आहे.