शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री पुरुषोत्तम दादा मोझरकर, श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ यांनी अचानक जि. प. प्राथमिक शाळा, तोंगलाबाद ता. दर्यापूर जि. अमरावती येथे भेट दिली. पुरुषोत्तम दादा मोझरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत मुख्याध्यापक तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नंदकिशोर रायबोले आणि शिक्षिका सौ. तेजस्विनी अटाळकर यांनी केले. ही शाळा १ ते ४ वर्गापर्यंत असून डिजीटल शाळा म्हणून ओळखण्यात येते. येथे मुलांना सेमी इंग्लिश शिकविण्यात येते. काॕम्पुटरचे ज्ञान देण्यात येते. येथील मुले इंग्रजीत बोलतात. या शाळेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शाळेच्या आवारात झाडे, फुलझाडे, फळझाडे लावून शाळा सुशोभित केली आहे. शाळेच्या आवारात सुंदर परसबाग उभी केली आहे. त्या परसबागेत भाजीपाला पिकविण्यात येतो. शाळेच्या भिंती इंग्रजी, मराठी तक्ते लावून रंगविली आहे. मुलांना बसण्यास बेंच व खुर्चीची व्यवस्था आहे. या मुलांचा वाचन कला, भाषण कला अवगत आहे.
शिक्षक दिनानिमीत्त पुरुषोत्तम दादा बैसकार यांनी शिक्षकासोबतच आई-वडील आपले प्रथम गुरु व शिक्षक आहे हे पटवून दिले. मुख्याध्यापक रायबोले यांनी शाळा कशी घडविली ते सांगितले. सौ. अटाळकर मॕडम यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले तसेच या शाळेकरिता आम्ही खूप काही केले आहे असे सांगितले. शाळेत मुलंमुली चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहे.
तात्पर्यः- आज खेड्यातील जि. प. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जि. प. ची शाळा ही सेमी इंग्लिश शाळा झाली पाहिजे. मुलमुली पहिली वर्गापासून इंग्रजीचे शिक्षण घेतील आणि शाळा सुद्धा बंद पडणार नाही. गावातील मुलमुली बाहेरगांवला शाळा शिकण्याकरिता जाणार नाही. गावातील जि. प. शाळेची सुधारणा व्हावी म्हणून गावातील पुढारी, नेते तसेच शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. एवढेच शिक्षक दिनानिमीत्त सांगायचे आहे.