कारंजा : जनता जनार्दनाला, आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याकरीता, प्रत्येक कामाकरीता, विजेची अत्यंत गरज आहे. मोठ मोठी इस्पितळे रुग्नालयात आजारी व्यक्तिंच्या उपचाराकरीता, स्वयंपाकगृहात मिक्सर, पाणी, चक्की चालविण्याकरीता, मोबाईल, कॉम्प्युटर चालविण्याकरीता, बँकांमध्ये रक्कमेची देवाण घेवाणी करीता, मोठमोठी उद्योग, कारखान्यामध्ये यंत्र चालविण्याकरीता, रात्रीला सुखमय झोप व्हावी म्हणून, पंखे, गुडनाईट, हिटर चालविण्याकरीता प्रत्येक ठिकाणी विज आवश्यक आहे. तेव्हा लागोपाठ तिन दिवस विज बंद असली तर नागरिकांमध्ये प्रचंड हाहाकार माजणार आहे. त्यामुळे शासनाने महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीच्या तिन दिवशीय संपावर तोडगा काढून, निष्पाप जनता जनार्दनाला या विद्युत संकटामधून वाचविण्याची मागणी, प्रसिद्धी पत्रकाद्वारे, महाराष्ट्र राज्यस्तरिय करंजमहात्म्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.