कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा)अंतर्गत मौजे शेलु बु.येथील माणिक बापूराव मोडक यांच्या शेतावर लागवड करण्यात आलेली संत्रा फळबाग प्लॉटला विभागीय आयुक्त अमरावती निधी पांडे मॅडम व बुवनेश्वरी एस मॅडम जिल्हाधिकारी वाशिम,अपूर्वा बासुर मॅडम सहाय्यक जिल्हाधिकारी वाशिम ,देवरे उपजिल्हा अधिकारी (आर डी सी ) वाशिम,मा.आरिफ शहा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम, कुणालजी झाल्टे तहसीलदार कारंजा व तसेच तालुका कृषी अधिकारी कारंजा रवींद्रजी जटाळे,मंडळ कृषी अधिकारी कारंजा गुणवंतराव ढोकने, मंडळ कृषी अधिकारी उंबर्डा बा. क्षीरसागर व कृषी सहायक एम एस सोळंके उपस्थित परिसरातील शेतकरी यांच्या समवेत संत्रा प्लॉटला भेट देऊन संत्रा प्लॉटची पाहणी केली असता संत्राविषयी सखोल अशी माहिती घेतली सदर प्लॉट विषयी विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम यांनी समाधान व्यक्त केले.