अकोला:-
शाळा व गावकऱ्यांनी आयोजित केला कार्यगौरव सोहळा.नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती आणि त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होत असतेच मात्र सेवा कर्तव्यात समर्पणाची भावना नसल्यास प्रभावी कार्य घडत नाही केवळ कर्तव्यपूर्ती सोहळे साजरे होतात मात्र डॉ. अविनाश बोर्डे हे समर्पित कार्य करणारे आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात उपस्थितीचा मला आनंद आहे असे प्रतिपादन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. श्री शिवाजी विद्यालय व कमवि रांजदा व गावकऱ्यांनी आयोजित या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते होते.श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड. गजाननराव पुडंकर, केशवराव मेतकर,दै. देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे,महादेवराव भुईभार,सस्थेच्या कार्यकारीनीचे सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे,सुरेशदादा खोटरे,प्रा. सुभाष बनसोडे, प्राचार्य डॉ.अंबादास कुलट,प्रा. नरेशचंद्र पाटील, डॉ. पुरुषोत्तम वायाळ, अशोक रघुवंशी, गंगाधर पाटील, पंडित पंडागळे, प्रकाश अंधारे, माणिकराव वणवे, गोपाळराव महल्ले, सरपंच करुणाताई अरखराव,हर्षा बोर्डे आदी व्यासपीठावर उपस्थित होते
श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये गेली 32 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करून राजंदा येथील श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. अविनाश बोर्डे हे 31 जुलै 2025 ला सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त शाळा आणि गावकऱ्यांनी त्यांचा कार्यगौरव सोहळा आयोजित केला होता. शाळा आणि गावकऱ्यांची नाळ जोडताना गावकऱ्यांसाठी रक्त व आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व ज्येष्ठांना चष्मे वाटप आदी उपक्रम शाळेमार्फत सरांनी राबवले तसेच शाळे लगतची टेकडी दत्तक घेऊन वृक्ष लागवड व संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला ज्यातुन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची भावना वृद्धिंगत होईल असे विविध कार्यक्रम सातत्याने शाळेमार्फत राबवले,त्यांच्या सेवाकाळात शाळेने सलग दोन वर्ष मुख्यमंत्री सुंदर शाळेचे बक्षीस प्राप्त केले अशा मुख्याध्यापकाचा कार्य गौरव सोहळा शाळा आणि गावकऱ्यांनी आयोजित केला होता, मला कोणत्याही प्रकारची भेट वस्तू न देता त्याऐवजी गावातील गरजू महिलांना रोजगार मिळेल या दृष्टीने स्वतः दोन शिलाई मशीन व शाळा आणि गावकऱ्यांच्या वतीने दोन शिलाई मशीन अशा चार शिलाई मशीन या सोहळ्या निमित्य गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या या सोहळ्याचे हे एक वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल बैस सूत्रसंचालन विजय ढुके तर आभार वंदना भटकर यांनी मानले या कार्यक्रमाला संस्थेचे सन्माननीय आजीवन सभासद विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मंगला मेश्राम, एकराज चव्हाण, ज्ञानेश्वर हुरसाळ, संजय डाबेराव ,कपले सर, हेमंत पाथ्रीकर, प्रशांत ढेवले, शिवाजी आंधळे, प्रकाश बायस्कर आदींनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....