त्या तीन दरोडे खोरांची माहिती देणाऱ्यास 10 हजाराचे बक्षीस,डूग्गिपार पोलिसांकडून जाहीर.
सावंगी, बामणी, फुटाळा, सौंदड, राका, पलशगाव, पिपरी, सुंदरी, परसोडी, या गावाच्या शेत शिवारात आरोपी असल्याची माहिती आहे.
सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 08 एप्रिल 2022 : तालुक्यातील टीचर कॉलोनी येथे 03 एप्रिल च्या रात्रीला 6 ते 7 घरी दरोडा घालून वाहनाची तोडफोड करून, मारहाण करून, अंदाजे 15 लाख रुपयाचे सोने आणि रोख रक्कम 7 लोकांनी चोरी करून लंपास केले.
यातील 4 आरोपी एका वाहनाने फरार झाले असून 3 आरोपी आरोपी तालुक्यातील शेत शिवारात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, त्या अनुसंगणे सावंगी, बामणी, फुटाळा, सौंदड, राका, पलशगाव, पिपरी, सुंदरी, परसोडी, या गावाकडे 04 एप्रिल पासून पोलीस तपास चालू आहे, जवळपास 100 पोलीस, होमगार्ड,LCB पथक, स्वान पथक सोधात आहेत.
आज डूग्गीपार पोलिश स्टेशन चे ठाणेदार सचिन वांगळे यांनी आरोपीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेऊन माहिती देणाऱ्या वेक्तीला 10,000 हजार रुपयाचे रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे, चोरी करून फरार झालेले 3 आरोपी आहेत, त्यातील एक आरोपी मार लागल्याने एका पायाने जखमी आहे तर अन्य दोन वेक्ती आहेत, त्यातील एकाकडे काळी ब्याग आहे, जनतेने आरोपीला सह देऊ नये, त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या खालील नंबर वर पोलिसांना माहिती द्या. :9356553363, 7829872651, 8550987950, 8830497590, 9403133877
आपल्या प्रतिक्रिया द्या....