महात्मा गांधी कला विज्ञान व स्व. न.पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य अभ्यास मंडळ व गणित अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी "गुंतवणूकदार जागरूकता" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोलीकर हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणूण भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) चे प्रमुख प्रशिक्षक मान. अॅड. राजेशजी पालीवाल हे उपस्थित होते.
सदरच्या एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मान. अॅड. राजेशजी पालीवाल यांनी सेबी, प्रतिभुती बाजार, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमधील जोखिम कमी करण्याचे उपाय, गुंतवणूक करतांना घ्यावयाची काळजी इत्यादी अनेक विषयांवर विस्तृत असे मार्गदर्शन केले. शेवटी प्रश्नोत्तराच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न व शंकाचे निरासरण करित विद्यार्थ्यांना छोटी-छोटी रक्कम गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यशाळेच्या प्रास्ताविक मार्गदर्शनात वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोज ठवरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील छोटी छोटी गुंतवणूक मोठे लाभ कसे मिळवून देते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी विद्यार्थ्यांना अशा नवनविन ज्ञानाचा लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे असे प्रतिपादन केले.
सदरच्या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अर्पित खरवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तेजस गायधने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीमान प्रशांत दडमल व सहकारी यांनी सहकार्य केले