शेगाव:-
संत साहित्यातील नैतिक मूल्ये, वैज्ञानिक व बुद्धी प्रामाण्यवादी या सूत्रांच्या आधारे उद्याच्या विकसित व सक्षम भारताचे स्वप्न साकार करू शकेल असा विश्वास शेगाव येथे संपन्न झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे सुप्रसिद्ध अभ्यासक धनराज वंजारी यांनी केले. यावेळी उद्घाटन समारंभाचे उद्घाटक महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री श्री वसंतराव पुरके, माजी मंत्री तथा आमदार श्री संजय कुटे, सर्जनशील शब्दवेल पनवेल चे अध्यक्ष श्री प्रवीण बोपुलकर , महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य पुष्पराज गावंडे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, संत साहित्याचे अभ्यासक डॉ राजेश मिरगे,ज्येष्ठ साहित्यिक प्रतिभा सराफ, शब्दवेलचे सल्लागार आबासाहेब कडू, यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती तर आयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन वरणकार, स्वागताध्यक्ष विनायकराव भारंबे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी ग्रंथ दिंडीचे पूजन संमेलनाध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक धनराज वंजारी , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा कीर्तनकार डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, आयोजक श्री प्रवीण बोपुलकर तथा सर्व साहित्यिक रसिक मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम स्थळी मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार आयोजन समितीचे सदस्यांनी शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन केला.
राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष श्री प्रवीण बोपुलकर म्हणाले की "साहित्य हे खऱ्या अर्थाने सामाजिक जीवन जगण्याची प्रेरणा आहे. या प्रेरणेतून साहित्य चळवळ आणि त्यातील विविध उपक्रम उभारण्याचे काम आम्ही शब्दवेलच्या माध्यमातून अविरतपणे करत आहोत . याचा आम्हाला आनंद वाटतो. या पाचव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संत साहित्यांचा विशेषांक आपल्या सर्वांना दिशा दिग्दर्शक ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर स्वागत पर भाषण श्री विनायक भारंबे यांनी करताना साहित्य व उद्योग साहित्य व आजची तरुणाई याबाबत नव्याने मांडणी व्हावी अशी सार्थ अपेक्षा करत मान्यवरांचे स्वागत केले तर कार्याध्यक्ष श्री नितीन वरणकर यांनी साहित्य समाजाभिमुख असावे त्यांचे प्रश्न सोडवणारे असावे व त्यातूनच नव्या प्रेरणा निर्माण व्हाव्या असा विचार मांडला.
उद्घाटन पर भाषण करताना माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी समग्र साहित्याचा वेध घेतला. साहित्य हे खऱ्या अर्थानं बलशाली युवा पिढी घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकेल असा सार्थ विश्वास व्यक्त करीत साहित्यातील विविध पैलू वर बहारदार चर्चा त्यांनी संमेलनात केल्याने रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय कुटे यांनी राजकारण व समाजकारण यातील समन्वयाचा सकारात्मक विचार मांडला ते म्हणाले की समाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिक ,लेखक करत असतात ते त्यांनी निरपेक्ष पद्धतीनं करण्याची आज गरज आहे. आज समाजाच्या अवतीभोवती प्रचंड ताण तणाव निर्माण झाल्याने सामान्य माणूस हतबल झाला आहे या पार्श्वभूमीवर त्याला दिशा देण्याचं काम साहित्यिक करू शकतात. त्यांनी जे सत्य आहे तोच विचार मांडावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री धनराज वंजारी पुढे म्हणाले की, संत साहित्य हे खऱ्या अर्थाने ज्ञान विज्ञानाची भाषा करणारे साहित्य आहे, समाजातली अंधश्रद्धा दूर करून डोळस विचार देऊन बौद्धिक समाज निर्मितीचे काम साहित्य करीत असते. त्यामध्ये संत साहित्य असत्य प्रवृत्तीवर प्रहार करीत सत्य जगवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न करते . आज समाज भरकटलेला आहे त्याला सत्याधिष्ठित मार्ग दाखवण्याची आज गरज आहे . संत साहित्याचा विचारच या जगाला वाचवू शकेल असे मला वाटते.यावेळी प्रसंगी शुभेच्छा पर मनोगते डॉ.राजेश मिरगे, डॉ प्रतिभा सराफ, श्री संजय देशमुख, पुष्पराज गावंडे यांनी यांनी दिल्या.
राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. त्यात प्रामुख्याने..
कार्यक्रमाचे आभार ओंकार राठोड तर सूत्रसंचालन अश्विनी अतकरे व श्रद्धा वरणकार
यांनी केले.
संमेलनाच्या उद्घाटनाच्याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेली साहित्यिक रसिक मंडळी तथा शेगाव नगरीतील मंडळी यांची भरगच्च अशी प्रामुख्याने उपस्थित होते .
आपल्या प्रतिक्रिया द्या....