शेतकऱ्याचा शेतमाल शासनाने ठरविलेल्या हमी भावापेक्षा कमी भावाने विकल्या गेल्याने शेतकरी नैराश्यात गेला आहे.याचाच परिणाम अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे . शेतकरी सन्मानाने जगावा तसेच त्याचा शेतमाल विक्रीचा तोटा भरून निघावा करीता शासनाने प्रती क्वींटल एक हजार रुपये भावांतर योजना राबऊन शेतकऱ्यांना बळ द्यावे.अशी मागणी किसान ब्रिगेड काजळेश्वर अध्यक्ष नितीन पाटील उपाध्ये यांनी शासनाकडे केली आहे.
वृत्त असे की यावर्षी सोयाबीन; चना; कापूस ह्या मुख्य पीकाचे उत्पादन प्रचंड घटले. रात्रीचा दिवस करीत वण्य प्राणी; रात्रीची विद्यूत; अवकाळी पाऊस इत्यादीचा धैर्याने मुकाबला करीत पीक काढले.तो शेतमाला जेव्हा विक्रीस गेला तेव्हा पडलेल्या शेतमाल भावामुळे त्याला प्रचंड तोटा सहन करावा लागला . किमान हमीभावाने तरी आपला शेतमाल विकल्या जाईल.ही आशा ठेऊन
होता मात्र बँक भरते वेळी तथा बीबीयाने खते खरेदी करतेवेळी शेतमालाचे भाव गडगडले.दोन वर्षापासून शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी हतबल झाला.किमान हमी भावाने तरी शेतमाल विक्री व्हावी असी आशा ठेऊन शेतकरी होता मात्र सोयाबीन; कापूस चना ह्या वानात शासनाने भावांतर योजना राबवावी; प्रती क्वींटल एक हजार रुपये भावातील फरक द्यावा'; बीबायाणे खत यांचे भाव नियंत्रणात ठेवावे व निवडणूकीत केलेल्या घोषणेनुसार कर्जमाफी शेतक-यांना द्यावी.अशी मागणी समस्त शेतकरी वर्गातर्फे किसान ब्रिगेड कडून काजळेश्वर शाखा अध्यक्ष नितीन पाटील उपाध्ये यांनी शासनाकडे केली असल्याचे त्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.